Download App

क्रिकेट कोचचे लज्जास्पद कृत्य, मद्यपान करतानाचे व्हिडिओ व्हायरल

Hyderabad Cricket Association : हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वरिष्ठ महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक विद्युत जयसिम्हा (Vidyut Jayasimha) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच विद्युत जयसिम्हाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये विद्युत जयसिम्हा टीम सोबतच्या बसमध्ये मद्यपान करताना दिसत आहे. यानंतर प्रचंड गदारोळ उडाला होता. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने (Hyderabad Cricket Association) विद्युत जयसिम्हाला निलंबित केले आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. यामुळे विद्युत जयसिम्हाच्या अडचणी वाढू शकतात.

विद्युत जयसिम्हावर काय आरोप?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चौकशी पूर्ण होईपर्यंत विद्युत जयसिम्हा क्रिकेटशी संबंधित उपक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. या संदर्भात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांनी विद्युत जयसिम्हा यांना पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

विद्युत जयसिम्हा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे बोलले जात आहे. याआधीही विद्युत जयसिम्हाने मद्यप्राशन केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र यावेळी विद्युत जयसिम्हाच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.

‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वीच तिसऱ्या भागाची घोषणा; अल्लू अर्जुनने स्वतःच केला खुलासा

या प्रकरणावर विद्युत जयसिम्हा काय म्हणाले?
यानंतर या संपूर्ण प्रकरणावर विद्युत जयसिम्हाची प्रतिक्रिया समोर आली आहे. विद्युत जयसिम्हाने क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिले आहे. या पत्रात विद्युत जयसिम्हाने लिहिले आहे की, माझी विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न आहे. हैदराबादच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलीला वरिष्ठ संघात समाविष्ट करण्यास नकार दिल्यामुळे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत.

Jnanpith Award 2023 : प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहिर!

मात्र, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यानंतर विद्युत जयसिम्हाबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र तोपर्यंत विद्युत जयसिम्हा क्रिकेटशी संबंधित कार्यक्रमापासून दूर राहणार आहे.

follow us

वेब स्टोरीज