लंडनमध्ये विराट-अनुष्का किर्तन ऐकण्यात दंग; व्हिडीओ व्हायरल

Virat Kohali and Anushka Sharma :  भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. नुकतेच कोहली आणि अनुष्का किर्तन […]

Letsupp Image   2023 06 17T175347.508

Letsupp Image 2023 06 17T175347.508

Virat Kohali and Anushka Sharma :  भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. नुकतेच कोहली आणि अनुष्का किर्तन ऐकण्यासाठी आले होते. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

खरंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्ये कृष्णा दास यांच्या कीर्तनात सहभागी झाले होते. कृष्णा दास हे अमेरिकन गायक आहेत. ते भक्तिगीतांसाठी ओळखले जातात. विराट आणि अनुष्काने यापूर्वीही अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. कोहली आणि अनुष्काने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेतले होते. तसेच दोघेही वृंदावनला गेले होते. यानंतर नुकत्याच झालेल्या कीर्तनाबाबत सोशल मीडियावर अनेक छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. या फोटो आणि व्हिडिओंवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विशेष म्हणजे भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येथे कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी विराट कोहली ब्रेकवर आहे. या दौऱ्यातून टीम इंडिया अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे खेळाडूंवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेतली जात आहे.

Exit mobile version