Virat Kohli : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (Ind Vs Eng) दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) इतिहास रचला आहे. विराटने सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मागे टाकत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) मोठा चमत्कार केला आहे.
विराट आशियाई भूमीवर सर्वात जलद 16 हजार धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने ही कामगिरी केली आहे. विराट आता आशियातील सर्वात जलद 16,000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यांने 340 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे तर सचिन तेंडुलकरने 353 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. याच बरोबर या सामन्यात विराटने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो इंग्लंडविरुद्ध 4 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. विराट कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडला 357 धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने 50 षटकांत 356 धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिलने त्याचे सातवे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली.
Fastest to reach 16000 runs in Asia:
Virat Kohli – 340* innings.
Sachin Tendulkar – 353 pic.twitter.com/BNPBFNvTzB
— Tanuj Singh (@ImTanujSingh) February 12, 2025
विराट कोहली (52) आणि श्रेयस अय्यर (78) यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने 55 चेंडूंचा सामना केल्यानंतर 7 चौकार आणि एक षटकार मारला. तर अय्यरने 64 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. गिलने कोहलीसोबत 116 धावांची आणि अय्यरसोबत 104 धावांची भागीदारी केली. केएल राहुलने 40 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पंड्याने 17 धावांचे योगदान दिले, वॉशिंग्टन सुंदरने 14 धावांचे योगदान दिले आणि अक्षर पटेलने 13 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माला फक्त 1 धाव करता आली.
रणवीर अलाहाबादियानंतर, मराठी युट्यूब चॅनल ‘भाडिपा’ वर आक्षेपार्ह कंटेंट पसरवण्याचा आरोप ; शो रद्द
इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज आदिल रशीदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क वुडीने दोन तर साकिब महमूद, जो रूट आणि गस अॅटकिन्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी कायम ठेवली आहे.