‘युवराजच्या निवृत्तीला विराट कोहलीच जबाबदार’, रॉबिन उथप्पाचा धक्कादायक दावा!
Robin Uthappa on Accusation on Virat Kohli : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावलं तर आपल्याला दोन भाग दिसतात. पहिला एमएस धोनीच्या नेतृत्वात आयसीसी विजेतेपद मिळवणं आणि दुसरा भाग म्हणजे त्या संघातील एकापेक्षा एक सरस खेळाडू. त्यावेळच्या संघात युवराज सिंग एक (Yuvraj Singh) स्टार खेळाडू होता. फलंदाजी आणि गोलंदाजीतही तो माहीर होता. 2007 मधील टी 20 वर्ल्डकप आणि 2011 चा वर्ल्डकपमधील तो हिरो होता. कॅन्सरशी लढा देत असतानाही त्याने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये मोठी कामगिरी केली होती.
पण, नंतर ज्यावेळी त्याने कॅन्सरवर मात करून पुन्हा टीम इंडियात (Team India) पदार्पण केलं त्यावेळी मात्र त्याला महत्व देणं बंद झालं होतं. मॅनेजमेंट, अधिकार आणि विचारही बदलला होता. त्यामुळे भारतीय संघातील हा अष्टपैलू खेळाडूला जड अंतःकरणाने निवृत्ती जाहीर करावी लागली. यानंतर आता भारतीय संघातील आणखी एक माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने विराट कोहली आणि युवराज सिंगबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्याला चांगलच ट्रोल केलं जात आहे. विराट कोहलीमुळेच युवराजला क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली, असा अप्रत्यक्ष दावा उथप्पाने एका मुलाखतीत केला.
विराटचं निलंबन की खिशाला भुर्दंड? धक्काबुक्कीचा काय होणार इफेक्ट; नियम काय सांगतो..
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत उथप्पा म्हणाला की विराटने युवराजला निवृत्ती घेण्यास भाग पाडलं. कोहली आणि व्यवस्थापनाने युवराज सिंगला चांगली वागणूक दिली नाही. विराट कोहलीची कप्तानी वेगळ्या धाटणीची होती. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याची गरज नेहमीच असायची. फिटने असो की त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी असोत या सर्वांसाठी ठराविक निकष होते. युवराज सिंगला संघातून बाहेर काढण्यात आल्याच्या मु्द्द्यावर उथप्पा म्हणाला, दोन वेगवेगळ्या प्रकारचे नेते असतात. या दोघांचाही त्यांच्या सहकाऱ्यांवरचा परिणाम वेगवेगळा असतो.
युवराजने कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापसीचे प्रयत्न करत होता. ज्या व्यक्तीने आपल्याला दोन विश्वकप जिंकून देण्यात मोलाचं योगदान दिलं तो हाच व्यक्ती होता. मग अशा खेळाडूसाठी जेव्हा तु्म्ही कर्णधार (विराट कोहली) बनता आणि म्हणता की त्याच्या फुप्फुसांची क्षमता कमी झाली आहे. ज्यावेळी तो संघर्ष करत होता त्यावेळी तुम्ही त्याच्या बरोबर होता.
युवराजने फिटनेस टेस्टच्याबाबतीत काही सवलती मागितल्या होत्या. परंतु, त्याची ही मागणी मान्य झाली नाही. तरी देखील त्याने टेस्ट दिली. टेस्ट पास केली आणि पुन्हा संघात आला. परंतु, एक टूर्नामेंट त्याच्यासाठी चांगली गेली नाही. यानंतर मात्र त्याला संघातून पूर्णपणे बाहेर करण्यात आलं. युवराजला पुन्हा संधी मिळाली नाही असे रॉबिन उथप्पा म्हणाला.
Virat Kohli : ज्याची भीती होती तेच झालं! विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आऊट