‘…Yuvraj Singh च्या आईने युवराजची कॉलर धरून काढले घराबाहेर’; पाहा VIDEO

‘…Yuvraj Singh च्या आईने युवराजची कॉलर धरून काढले घराबाहेर’; पाहा VIDEO

Video Viral : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (yuvraj singh ) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच सक्रिय आहेत. तो जे काही करत असतो, त्याविषयी त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. त्याला त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याकरिता व्हायरल (Video Viral) इंस्टाग्राम ट्रेंड (Instagram trends) आणि डांस चॅलेंज करणे देखील आवडते. आता त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर ताज्या पोस्टमध्ये त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याने त्याची आई शबनम सिंग आणि भाऊ जोरावर सिंग यांच्याबरोबर व्हायरल होत असलेल्या ‘कुन फया कुन’ ट्रेंडवर रील बनवला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे, “सांगा, आम्ही काय चूक केली का ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Zorawar Singh (@zove03)


रणबीर कपूर स्टारर रॉकस्टार चित्रपटामधील प्रसिद्ध गाणे ‘कुन फया कुन’ सध्या ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेंडमध्ये एक रील तयार केली जात आहे. यामध्ये एका व्यक्तीला अतिशय मजेशीर कारणासाठी घराबाहेर हाकलून दिले जात असते. युवराज सिंगने त्याचा भाऊ जोरावर आणि आई शबनम यांच्याबरोबर खूप मजेदार रील बनवली आहे. या तिघांनीही या रीलमध्ये उत्कृष्ट अभिनय केला.

कोथिंबीर ऐवजी पुदिना आणला –
युवराज सिंगने अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये, त्याच्या आईने त्याला आणि त्याच्या भावाला त्यांच्या सामान घेऊन घराबाहेर हाकलले आहे. कारण त्यांनी कोथिंबीरऐवजी पुदिना आणला होता. या व्हिडिओमध्ये लिहिले आहे, काही नाही भाऊ, आईने भाजी आणायला पाठवली होती, आम्ही कोथिंबीर ऐवजी पुदिना आणला होता. त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube