विराटसाठी काहीपण..! चाहता सुरक्षा तोडून मैदानात घुसला अन्.., व्हिडिओ होतोय व्हायरल

विराटच्या अशाच एका चाहत्याने तर कहरच केला. सुरक्षेचा घेरा तोडून हा चाहता थेट मैदानात आला आणि थेट विराटच्या पायाच पडला.

Virat Kohli

Virat Kohli

Virat Kohli Fan : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. त्याची एक झलक पाहण्यास मिळावी यासाठी फॅन्स नाही नाही ते करतात. आताही विराटच्या अशाच एका चाहत्याने तर कहरच केला. सुरक्षेचा घेरा तोडून हा चाहता थेट मैदानात आला आणि थेट विराटच्या पायाच पडला. या प्रसंगाच व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

क्रिकेट चाहत्याचा मैदानातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती प्रेक्षक गॅलरीतून निघतो आणि विराट कोहलीच्या दिशेने पळायला लागतो. यावेळी कोहली मैदानात स्लीपमध्ये फिल्डिंग करत असतो. हा फॅन सरळ मैदानात येऊन विराटच्या पाया पडताना व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

युवराजच्या निवृत्तीला विराट कोहलीच जबाबदार..रॉबिन उथप्पाचा धक्कादायक दावा!

यानंतर येथील सुरक्षारक्षक मैदानावर येतात आणि या व्यक्तीला पकडून स्टेडियमच्या बाहेर घेऊन जातात. या दरम्यान काही वेळासाठी सामना थांबवावा लागला. सुरक्षारक्षक त्या व्यक्तीला घेऊन बाहेर जातात तेव्हा सामना पुन्हा सुरू होतो. या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, असे प्रकार याआधीही अनेक वेळा घडले आहेत. आयपीएलच्या सामन्यांत तर असे प्रकार सर्रास दिसून येतात. या स्पर्धांमध्येही अनेकदा फॅन्स सुरक्षेचा घेरा तोडून विराट कोहलीच्या भेटीसाठी येत असल्याचे अनेकदा दिसले आहे.

गर्दीत धक्काबुक्की, तिघे जखमी

विराट कोहलीने जवळपास बारा वर्षांनंतर रणजी क्रिकेटमध्ये वापसी केली आहे. आज दिल्ली आणि टीम रेल्वे यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात दिल्ली संघात विराट आहे. त्यामुळे विराटला पाहण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत अचानक धक्काबुक्की आणि रेटारेटी सुरू झाली. यामुळे अनेक जण खाली पडून जखमी झाले. याच दरम्यान पोलिसांची एक दुचाकी वाहनाचेही नुकसान झले. तीन जण जखमी झाल्याचे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.

Exit mobile version