अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली… आणि क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या! घोषणेमध्ये अशी ४ नावं आहेत, जी ऐकून अनेकांना प्रश्न पडलाय, हे खेळाडू आहेत तरी कोण? गुरनूर ब्रार, मानव सुतार, हर्ष दुबे आणि प्रिंस यादव! अचानक यांना टीम इंडियात कशी एन्ट्री मिळाली? चला पाहूया या 4 नव्या ‘सरप्राईज’ची पूर्ण कहाणी!
पहिलं नाव आहे 23 वर्षांचा मानव सुथार. हा डावखुरा स्पिनर आहे. याला ‘लाल चेंडूचा स्पेशालिस्ट’ मानलं जातं. 2022-23 च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने फक्त 6 मॅचमध्ये 39 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा परफॉर्मन्स इतका खतरनाक होता की, राजस्थानच्या टीममध्ये रवी बिश्नोईला जागाच मिळाली नाही. अखेर बिश्नोईला गुजरातकडून खेळावं लागलं. मानवने 29 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 129 विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच बॅटिंगमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकही ठोकली आहेत.
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
दुसरं नाव आहे विदर्भाचा 23 वर्षांचा हर्ष दुबे. हा सुद्धा डावखुरा स्पिनर आहे. चेन्नईमध्ये आर. अश्विनच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपली गोलंदाजी सुधारली आहे. अनेकांना त्याच्यात रवींद्र जडेजाची झलक दिसते. 2024-25 च्या रणजी सीझनमध्ये हर्षने तब्बल 69 विकेट्स घेतल्या होत्या. एकाच सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा आशुतोष अमनचा रेकॉर्ड त्याने मोडला. त्याच्याच कॅप्टन्सीमध्ये विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी जिंकली. 27 फर्स्ट क्लास मॅचमध्ये त्याच्या नावावर 133 विकेट्स आहेत. यासोबत बॅटिंगमध्ये 9 अर्धशतक देखील लगावले आहेत, तो इंडिय ए संघाचा नियमित सदस्य देखील राहिलाय.
तिसरं नाव आहे 25 वर्षांचा गुरनूर ब्रार. गुरनूरची निवड त्याच्या आकड्यांमुळे नाही, तर त्याच्या ‘एक्स-फॅक्टर’मुळे झाली आहे. त्याची वेगवान गोलंदाजी आणि सपाट खेळपट्टीवर बाऊन्स मिळवण्याची क्षमता लाजवाब आहे. तो अप्रतिम ‘रिव्हर्स स्विंग’ करतो, म्हणूनच बीसीसीआयने त्याला ‘टारगेट पूल’मध्ये ठेवलं होतं. ऑस्ट्रेलिया ‘ए’ विरुद्ध कानपूरमध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या. तिथे त्याने मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णापेक्षाही जास्त प्रभावित केलं होतं.
चौथं आणि सर्वात गाजलेलं नाव म्हणजे 24 वर्षांचा प्रिंस यादव. याची वनडे टीममध्ये निवड झाली आहे. दिल्लीच्या या फास्ट बॉलरने विजय हजारे ट्रॉफीच्या 8 मॅचमध्ये 18 विकेट्स घेतल्या होत्या. तिथेच इशांत शर्माने त्याची ओळख विराट कोहलीशी करून दिली होती. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2026 मध्ये प्रिंसचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना त्याने विराट कोहलीला एका अप्रतिम बॉलवर ‘शून्य’ वर आऊट केलं. बॉल दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची त्याची क्षमता पाहून निवडकर्त्यांनी त्याला थेट टीम इंडियाचं तिकीट दिलं.
येत्या 6 जूनपासून न्यू चंदीगडमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. डोमेस्टिक क्रिकेट गाजवून आलेल्या या चार यंग स्टार्सना आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची मोठी संधी आहे. तुम्हाला काय वाटतं, या चौघांपैकी कोणाला भारतीय संघात संधी मिळावी? कमेंट करून नक्की सांगा!
