Download App

6,6,6,6… असे सिक्सर मारून अवघ्या 16 चेंडूत 90 धावा; MPA मध्ये जलद शतक झळकावणारा अर्शिन कुलकर्णी आहे तरी कोण?

  • Written By: Last Updated:

Arshin Kulkarni : नाशिकचा 18 वर्षीय अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) हा खेळाडू सध्या चर्चेत चांगलाच चर्चेत आला आहे. कारण अर्शिनने सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. यामध्ये त्याने अवघ्या 16 चेंडूत 90 धावांची तुफानी खेळी साकारली आहे. अर्शिनने तेरा असे सिक्सम मारून मोठा विक्रम केला. त्यानंतर अर्शिन कुलकर्णी आहेत तरी कोण, याची चर्चा क्रिकेटप्रेमींध्ये सुरू झाली आहे. (Who is Arshin Kulkarni?)

अर्शिनने हा विक्रम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये केला. ऋतुराज गायकवाड याच्या पुणेरी बाप्पा आणि नाशिक टायटन्स यांच्यात हा सामना रंगला होता. या सामन्यात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते 18 वर्षीय अर्शिनने. कारण त्याने शानदार फलंदाजी करत पुणे संघाची हवाच काढून घेतली होती. यावेळी मैदानातील प्रत्येक कोपऱ्याचे दर्शन अर्शिनने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर घडवले. दणकेबाज फटकेबाजी करत अर्शिनने शतक झळकावले. आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील हे सर्वांत वेगवान शतक ठरले. यावेळी अर्शिनने 13 सिक्स आणि तीन चौकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. त्यामुळे अर्शिनने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 90 धावा केल्या, त्यामुळे त्याला 46 चेंडूत आपले शतक पूर्ण करता आले. अर्शिन फक्त इथेच थांबला नाही, तर त्याने अचूक गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर हा अर्शिन नेमका आहे तरी कोण आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली.

कोण आहे अर्शिन कुलकर्णी?

अर्शिन हा महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील एक १८ वर्षांचा अष्टपैलू खेळाडू आहे. अर्शिनने या सामन्यात केवळ धडाकेबाज शतकच केले नाही तर त्याला केवळ चार विकेट्स मिळवल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या संघाला यावेळी विजयासाठी अखररच्या षटकांत फक्त पाच धावा हव्या होत्या. पण अर्शिनने अचूक आणि भेदक गोलंदाजी करत पाच धावांचा बचाव केला आणि टायटन्सच्या विजयाचा मोलाचा वाटा उचलल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अर्शिन हा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

UPSC टॉपर रिया दाबीशी विवाह, कोण आहेत IPS मनीष कुमार? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन 

अर्शिन एकाच सामन्यात शतक आणि चार विकेट्स मिळवण्याची दमदार अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्याच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतील.

Tags

follow us