Download App

‘या’ कारणामुळे अजित आगरकरची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड

  • Written By: Last Updated:

BCCI Chief Selector: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये चेतन शर्माने बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बीसीसीआय मुख्य निवडकर्त्यासाठी उमेदवार शोधत होता. मात्र, आता अजित आगरकर मुख्य निवड समितीची जबाबदारी सांभाळणार आहेत. पण अजित आगरकर यांना मुख्य निवडकर्ता का करण्यात आले? टीम इंडियाच्या या माजी अष्टपैलू खेळाडूकडे का लक्ष देण्यात आले? अजित आगरकर यांची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली अशी पाच कारणे आपण पाहू. (why-former-india-cricketer-ajit-agarkar-has-been-appointed-as-chief-selector)

1 – अजित आगरकर इतर स्पर्धकांच्या तुलनेत तरुण आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय मुख्य निवडकर्ता पदासाठी तरुण उमेदवाराच्या शोधात होता. तसेच, बीसीसीआय टी-20 क्रिकेट खेळलेल्या उमेदवाराच्या शोधात होते.

2 – अनुभवाला प्राधान्य…

क्रिकेट सोडल्यानंतरही अजित आगरकर समालोचक किंवा क्रीडा कर्मचारी म्हणून क्रिकेटशी जोडले गेले. तो आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित होता. याशिवाय त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य निवडकर्ता म्हणून काम केले आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

3 – अजित आगरकर यांची क्रिकेट कारकीर्द

अजित आगरकरने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 349 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय अजित आगरकर यांची क्रिकेटशी निगडीत समज उत्कृष्ट असल्याचे मानले जाते. त्यामुळे बीसीसीआयने इतर उमेदवारांपेक्षा अजित आगरकर यांना पसंती दिली.

4 – बाकीच्या उमेदवारांशी पैशाची चर्चा होत नव्हती का?

अनेक बड्या खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केला नसल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. वास्तविक, असे बोलले जात आहे की बीसीसीआय जेवढे पैसे देऊ करत होते त्यासाठी अनेक मोठे खेळाडू तयार नव्हते. यानंतर बीसीसीआयची पहिली पसंती अजित आगरकर होते.

5 – फक्त अजित आगरकरांचीच मुलाखत होती का?

क्रिकबझच्या मते अजित आगरकर हे एकमेव उमेदवार होते ज्यांची मुलाखत घेण्यात आली होती. उर्वरित अर्जदारांची मुलाखत घेण्यात आली नाही. मात्र, या पदासाठी अजित आगरकर यांच्याशिवाय अन्य तीन उमेदवारांनी अर्ज केल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us