Download App

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार, रोहित शर्माला मोठा धक्का

Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मोठा उलटफेर केला आहे. आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईचा कर्णधार बनवण्यात आला आहे. याबाबत मुंबई इंडियन्सने अधिकृत घोषणा केली आहे.

आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने पांड्याचा ट्रेड केला होता. पांड्या याआधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातही चॅम्पियन झाला. हार्दिकच्या पुनरागमनामुळे त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

रोहित शर्मा आतापर्यंत मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ पाच वेळा चॅम्पियन बनला. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले होते. रोहितची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 243 सामन्यात 6211 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 42 अर्धशतके केली आहेत. रोहितने एप्रिल 2008 मध्‍ये करिअरचा पहिला आयपीएल सामना खेळला. डेक्कन चार्जेसकडून खेळताना रोहितने पदार्पण केले होते.
इंग्लंडचे 136 धावांवर लोटांगण, टीम इंडियाकडे मोठी आघाडी; शर्माची घातक गोलंदाजी
मुंबईने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक निवेदन जारी करून पंड्याला कर्णधार बनवल्याची बातमी शेअर केली आहे. मुंबईने निवेदनात लिहिले की, ‘मुंबई इंडियन्स आज कर्णधार बदलाची घोषणा करत आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या पुढच्या सत्रात कर्णधार असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत यश मिळवले आहे. पुढं लिहिले की, आमची टीम रोहित शर्माची आभारी आहे. 2013 पासून आतापर्यंतचा त्यांचा कार्यकाळ उत्कृष्ट राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे.

पांड्या याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपदही पटकावले आणि संघाने गेल्या मोसमात अंतिम फेरीही गाठली. हार्दिकची आयपीएलमधील वैयक्तिक कामगिरी पाहिली तर तो उत्कृष्ट राहिला आहे. पांड्याने आतापर्यंत 123 आयपीएल सामने खेळले आहेत. यात 2309 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत. 17 धावांत 3 विकेट ही हार्दिकची आयपीएल सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत त्याने 10 अर्धशतकेही झळकावली आहेत.

Tags

follow us