Download App

Rohit Sharma : हार्दिकला डच्चू? टी 20 संघाची कमान पुन्हा रोहितच्या हाती, BCCI निर्णयाच्या तयारीत

Rohit Sharma : विश्वचषकानंतर टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (IND vs SA Series) उद्यापासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ टी 20, कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र हा दौरा सुरू होण्याआधीच एक महत्वाची माहिती हाती आली आहे. टी 20 मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदावरून कदाचित हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) डच्चू मिळू शकतो. त्याच्या जागी वनडे कर्णधार रोहित शर्मालाच (Rohit Sharma) पसंती दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. काल बीसीसीआयची एक महत्वाची बैठक पार पडली. त्यात या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) मालिकेनंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार (T20 World Cup 2024) आहे. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. सध्या हार्दिक पांड्याकडे भारतीय संघाचे टी 20 संघाचे कर्णधारपद आहे. मात्र काही दिवसांपासून हार्दिक दुखापतग्रस्त आहे. विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवची हंगामी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास, आता हिटमॅन पहिल्या क्रमांकावर..

एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धाही होणार (IPL 2024) आहेत. यानंतर टी 20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. आता वेळ कमी राहिला आहे. त्यामुळे हार्दिकला तयारीसाठी अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत आहे. या गोष्टींचा विचार करून संघ व्यवस्थापन वेगळा विचार करण्याच्याा विचारात असल्याचे बोलले जात आहे.

सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) कर्णधार होऊ शकतो परंतु त्याच्याकडे फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत एकच नाव पुढे येते ते म्हणजे रोहित शर्मा. विराट कोहली सुद्धा आहे. मात्र कर्णधार म्हणून तो नेहमीच अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच व्यवस्थापनाला योग्य वाटत आहे. त्यामुळे टी 20 च्या कर्णधारपदाची माळ पुन्हा रोहितच्याच गळ्यात पडू शकते अशी चिन्हे आहेत. मात्र, या सगळ्या शक्यता आहेत यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

Rohit Sharma to Hitman : सलामीवीर म्हणून रोहित शर्माच्या कारकिर्दीला दहा वर्ष पूर्ण

रोहित शर्माने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकले आणि अंतिम सामन्यात एन्ट्री घेतली होती. या स्पर्धेत अंतिम सामना सोडला तर एकाही सामन्यात भारताचा पराभव झाला नाही.

Tags

follow us