World Cup 2023 : वर्ल्डकप सुरु झाल्यापासून दुसरा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला होता. यापूर्वी 15 ऑक्टोबरला अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. या उलटफेरामुळे उपांत्य फेरीची शर्यत आणखीनच रोमांचक बनली आहे. नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानने केलेल्या उलटफेरामुळे उपांत्य फेरीतील इतर संघांना फायदा होणार आहे.
नेदरलँड्सकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाल्यानंतर गुणतालिकेत त्यांच्या कोणताही बदल झाला नाही. सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या पराभवामुळे त्यांचा निव्वळ रनरेट घसरला आहे. टीम इंडिया पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.
असं असेल दक्षिण आफ्रिकेचं गणित
दक्षिण आफ्रिकेला आता इंग्लंड, बांग्लादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळायचे आहेत. बांग्लादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजयाची शक्यता जास्त आहे. नेदरलँडविरुद्धच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला उर्वरित 6 पैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील. असे झाल्यास संघाला 7 सामने जिंकून 14 गुण मिळतील. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची उपांत्या फेरी खेळण्याची शक्यता वाढेल.
शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
भारतापुढे कोणते आव्हान?
भारत गुणतालिकेत अव्वल आहे, पण त्याचा पुढचा सामना बांग्लादेशविरुद्ध आहे. हा संघ धक्का देण्यात पटाईत आहेत. रेकॉर्डवर नजर टाकली तर 2019 च्या विश्वचषकानंतर भारत आणि बांग्लादेश यांच्यात 4 सामने खेळले गेले. या 4 पैकी 3 सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये आशिया कपमधील सुपर 4 सामन्याचाही समावेश आहे.
अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला आहे. आता अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरु आहे. न्यूझीलंड प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 289 धावांचे टार्गेट दिले आहे. मागील सामन्याप्रमाणे अफगाणिस्तानने पुन्हा उलटफेर केला तर न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण होणार आहे. न्यूझीलंडला भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 5 पैकी किमान 4 सामने जिंकावे लागतील.
आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; करण जोहरने दाखवली ‘Koffee With Karan 8’ची पहिली झलक
याशिवाय न्यूझीलंडने अफगाणिस्तानला हरवल्यास त्यांचे 2 सोपे गुण कमी होतील. यासह ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडही तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी शर्यतीत राहतील. या स्थितीत सर्व संघाचे लक्ष उर्वरित प्रत्येक सामना जिंकण्यावर असेल.