शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

  • Written By: Published:
शेतकरी नेते पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : शेतीमालाच्या हमीभावाचा लढा उभारणारे शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या (State Agricultural Value Commission) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात पटेल यांची ओळख आहे. पटेल यांच्या माध्यमातून दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्चा मित्राला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पुन्हा एकदा  राज्य मूल्य आयोगावर काम करण्याची संधी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

समलैंगिक जोडप्याचा सविनय कायदेभंग; निकालाच्या दुसऱ्या दिवशी कोर्टाबाहेरच उरकला साखरपुडा 

शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, यासाठी राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यात आला. आता या आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. पटेल हे याआधीही राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. पटेल हे शेतकरी संघटनेतून पुढे आलेले कार्यकर्ते आहेत. शरद जोशींच्या नेतत्वाखालील अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. शेतीविषयक अभ्यासू नेतृत्व व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्कृष्ट जाणकार म्हणून ते ओळखले जातात.

पटेल यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव ठरवतांना त्यांच्या पदरात काहीतरी चांगलं पडेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात व पाशा पटेल यांच्या मध्ये कायमच गुरू – शिष्याचे नाते आजवर राहिलेले आहे. पाशा पटेल यांच्याशी असलेल्या या नात्याबाबत धनंजय मुंडे यांनी नुकतेच औसा (जि. लातूर) येथे एका भाषणात बोलून दाखवले होते. दरम्यान आज या नियुक्तीच्या माध्यमातून आपण पाशा पटेल यांना गुरुदक्षिणा दिली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पाशा पटेल यांचे कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान आहे. बांबू लागवड, बांबूवरील संशोधन तसेच बांबू पासून विविध वस्तू निर्मिती याबाबतचा औसा येथील त्यांचा प्रकल्प मॉडेल आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पाशा पटेल पुन्हा एकदा आपल्या कार्याचा ठसा उमटवत शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील, असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube