Team India Victory Parade : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 चे (T20 World Cup 2024) विजेतेपद पटकावल्यानंतर आज भारतीय संघ (Team India) मायदेशी परतली आहे.
मायदेशी परतल्यानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेऊन भारतीय संघ मुंबई दाखल झाला आहे. मुंबईत भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते उपस्थित आहे. मरीन ड्राइव्हपासून वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) पर्यंत भारतीय संघाची विजयी मिरवणूक निघाली आहे.
#WATCH | Rohit Sharma and Virat Kohli lift the #T20WorldCup2024 trophy and show it to the fans who have gathered to see them hold their victory parade, in Mumbai. pic.twitter.com/jJsgeYhBnw
— ANI (@ANI) July 4, 2024
या मिरवणुकीमध्ये वानखेडे स्टेडियमसह मरीन ड्राइव्हवर (Marine Drive) देखील क्रिकेट प्रेमींचा जनसागर दिसून येत आहे. मात्र त्यापूर्वी मुबई विमानतळावर अग्निशमन दलाच्यावतीने भारतीय संघाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. त्यानंतर बसमध्ये बसून भारतीय संघ वानखेडे स्टेडियमकडे जात आहे.
#WATCH | Team India greets fans as it conducts their victory parade in Mumbai.#T20WorldCup2024 pic.twitter.com/zG4rWVdJHS
— ANI (@ANI) July 4, 2024
विजय मिरवणूक सुरु होताच भारतीय संघाचे सर्व खेळाडू डबलडेकर बसच्यावर पोहोचले. यावेळी आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी काही चाहते चक्क झाडांवर देखील चढले होते. सध्या मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने भारतीय संघाची विजय मिरवणूक संथ गतीने वानखेडे जात आहे.
विश्वविजेत्या भारतीय खेळाडूंच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्ह गर्दीने फुलून गेला होता. #TeamIndia #VictoryParade pic.twitter.com/hNJYTbUSWP
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 4, 2024
वानखेडे स्टेडियममध्ये बीसीसीआयकडून (BCCI) विश्वविजेता भारतीय संघाचा सत्कार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाच्या विजय मिरवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुबई पोलिसांनी चाहत्यांना मरीन ड्राईव्हवर येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे मात्र तरीही देखील चाहते मरीन ड्राईव्हवर येत आहे.
विजयी रॅलीत कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाच्या घोषणा देताना क्रिकेटप्रेमी #VictoryParade #RohitSharma𓃵 #IndiaWinWorldCup #bcci pic.twitter.com/a9PxhDyg7b
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 4, 2024
कार खरेदीची तयारी? होणार 55 हजारांची बचत, टाटा देतोय ‘या’ कार्सवर बंपर डिस्काउंट