World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा ज्वर आतापासूनच चाहत्यांमध्ये चढला आहे. वर्ल्ड कप सुरु व्हायला अजून 100 दिवस बाकी असतानाच त्यांनी हॉटेल्स आणि फ्लाइट बुकिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अहमदाबादला जाणार्या फ्लाइटचे दर 350 टक्क्यांनी वाढले आहेत. याचे कारण म्हणजे 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान विश्वचषक सामना.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलामीचा सामना, अंतिम सामना आणि भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे व्हीव्हीआयपी, क्रिकेट टीम आणि प्रायोजकांनी आपली हॉटेल्स आणि फ्लाइट बुकिंग केली आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या एक दिवस आधी 14 ऑक्टोबर रोजी दिल्ली आणि अहमदाबाद दरम्यानच्या फ्लाइटच्या तिकीट दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्ली ते अहमदाबाद किंवा मुंबई ते अहमदाबाद या फ्लाइट दर सध्या 15,000 ते 22,000 रुपये आहे. तीन महिने अगोदर बुकिंग करूनही ही दरवाढ झाली आहे.
चेन्नई ते अहमदाबाद तुम्हाला प्रति व्यक्ती नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी तब्बल 45,425 रुपये मोजावे लागतील. सामान्य परिस्थितीत, एका फेरीसाठी 10,000 रुपये खर्च येतो. काही हॉटेल्स 10,0000 रुपयेच्या जवळपास शुल्क आकारत आहेत, तर सामान्य दिवशी त्यांच्या किमती 5000-8000 रुपयेच्या दरम्यान असतात. अहमदाबाद येथील जवळपास 80 टक्के हॉटेल आतापासूनच बुक झाले आहेत.
Anupam Kher: ‘फक्त टक्कल असलेली व्यक्ती…’; अनुपम खेर यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. यातील तीन महत्वाचे सामने अहमदाबादला होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी मागणी पाहता 14-16 ऑक्टोबरसाठी प्रमुख भारतीय शहरांमधून अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटच्या तिकिट दरात अनेक पटींनी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबई ते अहमदाबादच्या फ्लाइटच्या भाड्यात अनुक्रमे 203 टक्के आणि 339 टक्के वाढ झाली आहे.
Carlos Alcaraz : परिस्थितीने वडिलांना टेनिस खेळू नाही दिलं, पण मुलाच्या खेळाची प्रेक्षकांना भूरळ…
फ्लाइट तिकिटांच्या किमती वाढल्याबद्दल बोलताना ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय) अध्यक्ष वीरेंद्र शाह म्हणाले की, सामन्याच्या दिवसांत जास्त मागणी असल्याने ही वाढ करण्यात आली आहे. “सुरुवातीच्या आणि अंतिम सामन्याच्या दिवशी मोठी मागणी नसली तरी भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल चाहत्यामध्ये प्रचंड उत्साह आहे.”