Download App

World Cup 2023 : श्रीलंकेच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; आफ्रिकेचा संघ ठरला कारणीभूत

World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल दक्षिण आफ्रिका संघाने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ (World Cup 2023) झाली आहे. आज टीम इंडियाचा (Team India) सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारताचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयी वाटचाल अशीच कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, या सामन्याआधी भारताचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. गुणतालिकेत आफ्रिकेने (South Africa) भारताला धक्का दिला आहे.

टीम इंडिया 12 गुणांसह गुणतालिकेत टॉपवर होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. त्यामुळे टीम इंडिया आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडवर मिळालेल्या विजयामुळे आफ्रिका संघाचे 12 गुण झाले आहेत. दोन्ही संघांचे समान गुण आहेत. तरीदेखील भारताला दुसरा क्रमांक मिळाला आहे. याचे कारण म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा रनरेट भारतापेक्षा चांगला आहे. जर भारताने आजच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले तर भारत पुन्हा पहिल्या क्रमांकावर विराजमान होऊ शकतो.

वानखेडेवर पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे अनावरण

टीम इंडियाचं टेन्शन कायम

विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड (World Cup 2023) सुरूच आहे. इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघाने विजयाचा षटकार लगावला. या स्पर्धेत फक्त भारतीय संघच (Team India)असा आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचे आणखी तीन सामने बाकी आहेत. त्यानंतर सेमी फायनलचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) काही समस्या भेडसावत आहेत. या समस्या संघातील चार खेळाडूंशी संबंधित आहेत. शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सिराज आणि हार्दिक पांड्या हे ते चार खेळाडू आहेत. आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना आहे. त्यामुळे या समस्या या सामन्यातही कायम राहण्याचीच शक्यता आहे.

रोहित शर्माच्या कप्तानीत संघ जोरदार कामगिरी करत आहे. संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. रोहित शर्मा जे काही निर्णय घेत आहे ते यशस्वी ठरत आहेत. मात्र तरीही अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ज्यामुळे रोहित शर्मापुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु, तशी परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

World Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय?

Tags

follow us