Hardik Pandya : भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या दुखापतग्रस्त आहे. सुरुवातीला त्याची दुखापत फार गंभीर नाही असे सांगण्यात आले होते. आता मात्र टीम इंडियाचे (Team India) टेन्शन वाढविणारी बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्या कदाचित संपूर्ण वर्ल्डकपलाच (World Cup 2023) मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बांग्लादेशविरुद्ध 19 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर पुढील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही तो उपलब्ध नव्हता. त्यानंतर हार्दिकने उपचारासाठी बंगळुरू गाठले.
या घडामोडींनंतर आता त्याच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिकच्या टाचेला ग्रेड वन प्रकारातील दुखापत झाली आहे. त्यामुळे तो विश्वचषकातील पुढील सामने खेळेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. एनसीएमध्ये वैद्यकिय पथकाच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हार्दिकची दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुखापतीतून बरे होण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून हार्दिक खेळण्यासाठी उपलब्ध नसेल असे भारतीय संघाला कळविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील सामन्यात हार्दिक दिसेल याची शक्यता आता मावळली आहे.
येथील वैद्यकिय पथक हार्दिक पांड्यावर उपचार करत आहे. जोपर्यंत तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्याला सोडले जाणार नाही. यासाठी अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत विश्वचषकात हार्दिक पांड्या नसेल अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. तो जर खेळला नाही तर पुढील सामन्यात संघाला त्याची कमतरता नक्कीच जाणवेल.
SL vs ENG: गतविजेत्या इंग्लंडचे पॅकअप? लंकेकडूनही झाला मोठा पराभव
विश्वचषकात टीम इंडिया टॉप
भारत गुणतालिकेत टॉपवर आहे. या संघाने अद्यापर एकही सामना गमावलेला नाही. साउथ आफ्रिका दुसऱ्या तर न्यझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे समान म्हणजेच 8 गु्ण आहेत. पण, आफ्रिकेच्या संघाचा रनरेट चांगला असल्याने दुसरा क्रमांक मिळाला आहे. पाकिस्तान चौथ्या तर अफगाणिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे चार-चार गुण आहेत. पाकिस्तान टीमचा सलग तीन सामन्यात पराभव झाला आहे.