Download App

World Cup 2023 : टीम इंडियाचा मोठा निर्णय! आजच्या सामन्यात ‘या’ खेळाडूंना एन्ट्री नाहीच

World Cup 2023 : विश्वचषकात विजयाची हॅट्रिक केलेला भारतीय संघ (World Cup 2023) आज पुण्यात बांग्लादेशला भिडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. स्पर्धेतील सेमी फायनलच्या दृष्टीने आजचा सामना भारतासाठी (IND vs BAN) महत्वाचा ठरणार आहे. तर बांग्लादेशनेही (Bangladesh) सामना जिंकण्याचा निश्चय केला आहे. सध्या या स्पर्धेत अनेक उलटफेर होताना दिसत आहेत. त्यामुळे भारतीय संघाने (Team India) सावध राहण्याची गरज आहे. या सामन्यासाठी बाहेर असलेल्या खेळाडू्ंना संधी मिळणार का, या प्रश्नाचे उत्तर संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकांनी दिले आहे.

बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या विजयी संयोजनाशी कोणतीच तडजोड करणार नाही असे प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितले. याचाच अर्थ असा की या सामन्यात संघाबाहेर असलेले सूर्यकुमार यादव आणि शमी यांना सध्या तरी संधी मिळणार नाही. संघाचे हित लक्षात घेता संघ व्यवस्थापनाने आर. अश्विन, शमी, सूर्यकुमार यादव यांसारख्या खेळाडूंना अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे म्हांब्रे म्हणाले.

चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड

संघात काही बदल करण्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला सध्याची विजयी वाटचाल कायम ठेवायची आहे. शमी आणि अश्विनसारख्या दर्जेदार खेळाडूंना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय कठोर आहे. परंतु, निर्णय घेताना संघ व्यवस्थापन सर्व खेळाडूंशी चर्चा करते असेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित शर्माच्या चुकीला माफी नाहीच 

भारत-बांग्लादेश सामना आज (गुरुवारी) पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणार आहे. यासाठी भारतीय टीम पुण्यातील मुक्कामी आहे. त्यापूर्वी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) पुणे पोलीसांनी दंड ठोठवला आहे. रोहित शर्मा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अतिशय वेगाने कार चालवत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार रोहित शर्माविरुद्ध पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी तीन तीन चालान जारी केले आहे. भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित तीन-चार दिवसांची विश्रांती होती. दरम्यान तो कुटुंबाला भेटण्यासाठी मुंबईला गेला होता. कुटुंबाला भेटून पुण्याला येत असताना त्याने वाहतुकीचे नियम मोडले.

चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड

Tags

follow us