Download App

धर्मशालात दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या खेळणार?; BCCI ने दिली मोठी अपडेट

  • Written By: Last Updated:

Hardik Pandya Health Update :  विश्वचषक सामन्यात काल (दि. 19) पुण्यात झालेल्या बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हार्दिक पांड्याच्या हेल्थबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. काल प्राथमिक उपारानंतर हार्दिकला पुण्याहून बंगळुरू येथे हलवण्यात आले असून, त्याच्यावर इंग्लंडचे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, येत्या रविवारी (दि. 22) धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात पांड्या खेळू शकणार नाहीये. त्यामुळे भारतीय संघासह चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.

India vs Bangladesh: वर्ल्डकपमध्ये विराटचं पहिलं शतक; नवऱ्याचं तोंडभरून कौतुक करत अनुष्काची पोस्ट

विश्वचषकातील यंदाच्या हंगामातील 17 वा सामना भारत विरूद्ध बांग्लादेश यांच्यात पुण्यातील एमसीए मैदानावर खेळवला गेला. यात नाणेफेक जिंकून बांग्लादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गोलंदाजी करताना भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याची उर्वरित बॉलिंग माजी कर्णधार विराट कोहली याने पूर्ण केली. (Hardik Pandya Health Update)

मैदानात नेमकं काय घडलं?

नाणेफेक जिंकल्यानंतर बांग्लादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पांड्या नववी ओव्हर टाकत होता. त्याच्या बॉलिंगवर लिटन दासने फ्रंट शॉट खेळला. हा मारलेला शॉट हार्दिकने पायाने रोखण्याचा प्रयत्न केला. हा मार लागल्यानंतर हार्दिकवर वैद्यकीय पथकाने मैदानावर धाव घेत प्राथमिक उपचार केले. यानंतर पांड्या गोलंदाजीसाठी पुन्हा उभा राहिला. मात्र, त्याला धावता येत नव्हते. त्यामुळे अखेर त्याला मैदान सोडावे लागले. यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पांड्याची उर्वरित ओव्हर पूर्ण केली.

World Cup 2023 : टीम इंडियासाठी थोडी खुशी, थोडा गम; बांग्लादेशला हरवूनही फायदा नाहीच

लखनौमध्ये टीम इंडियामध्ये सहभागी होण्याची शक्यता

आगामी न्यूझीलंडसोबतच्या सामन्यात हार्दिकची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे टीम इंडियासह चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. पण त्यानंतर लखनौमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात हार्दिक सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेतील भारताचा हा सहावा सामना असेल.

Tags

follow us