Download App

‘किस्से वर्ल्डकप’ चे वर्ष 1987! पैशांची चणचण, साळवेंची खेळी अन्… वाचा, रंजक किस्सा…

  • Written By: Last Updated:

World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय विश्वचषकाच्या (World Cup 2023) थराराला सुरूवात होणार आहे. भारत चौथ्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून, पहिल्यांदाच विश्वचषकाचे यजमानपद एकट्या भारताकडून केले जात आहे. याआधी भारताने 1987 साली पाकिस्तानसोबत पहिल्यांदा भागीदारीत विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी इंग्लंडबाहेर विश्वचषक खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. हा विश्वचषक इंग्लड बाहेर नेण्यामागे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांचा मोठा वाटा होता. साळवे यांनी, वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर नेण्यासाठी एवढे प्रयत्न का केले? पैसे नसतानाही भारताने याजमानपद कसं खेचून आणलं? जाणून घेऊ भारताने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या 1987 च्या वन डे वर्ल्ड कपचा रंजक किस्सा…

WC 2023 : मैदानात कोण सरस कोण कमजोर?; जाणून घ्या, प्रमुख संघांची INSIDE STORY

साळवेंनी वर्ल्ड कपसाठी एवढे प्रयत्न का केले?

याची सुरूवात झाली होती 1983 मध्ये त्यावेळी इंग्लंमध्ये आयोजित वर्ल्ड कप फायनलमध्ये साळवे यांना केवळ दोन पास मिळाले होते. मात्र त्यांच्यासोबत भारतातून सामना पाहण्यासाठी आलेल्या इतरांना पास मिळाले नव्हते. तेव्हाच साळवे यांनी ठरवलं की, आता वर्ल्ड कप भारतात होणार. पण हे सोप नव्हतं. त्यामध्ये प्रचंड अडचणी आल्या मात्र बीसीसीआयने पैसे नसतानाही याजमानपद खेचून आणलंच.

World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर

वर्ल्ड कपचं आयोजन करण्यासाठी 30 कोटी रूपायांची आवश्यकता होती. त्यावेळी बीसीसीआयकडे तेवढे पैसे नव्हते. हे पैसे जमवण्याचं आव्हान भारतापुढे होतं. तेव्हा साळवे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या माध्यमातून धीरूभाई अंबानी यांना मदत मागितली. त्यात इंदिरा गाधींचंही निधन झालं. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मात्र राजीव आणि अंबानी परिवाराचे संबंध तेवढे चांगले नव्हते. त्यात राजीव यांनी व्हिपी सिंहांना अर्थमंत्री केलं जे अंबानींचे नावडते होते. त्यामुळे वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी पैसे मिळण कठीण झालं.

World Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू अक्षर पटेल संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशात हे यजमानपद विभागलेलं होतं. 30 कोटींपैंकी दोन तृतीयांश म्हणजे 20 कोटींची रक्कम भारताला द्यावी लागणार होती कारण भारतात जास्त सामने होणार होते. स्पॉन्सरशिप आणि टीव्ही राईट्समधून येणार पैसा वर्ल्ड कपनंतर येणार होता. मात्र गॅरंटी रक्कम म्हणून अगोदच पैसे असणं गरजेचं होतं. त्यात बीसीसीआयने कंपन्या आणि उद्योगपतींकडे मदत मागितली. पण ती रक्कम पुरेशा नव्हती.

World Cup 2023: विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ जाहीर, तमीम इक्बालला डच्चू

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने साळवेंनी राजीव गांधींशी संपर्क साधला. मात्र ही रक्कम त्याकाळी सरकारसाठी मोठी होती. त्यामुळे देशातील स्थिती बिघडली असती. सरकारने पैसे देण्याचा निर्णय घेतला पण तोही पुरेसा नव्हता. त्यात ब्रॉडकास्टर दुरदर्शनने देखील एक समस्या उभी केली. ती म्हणजे ते रॉयल्टीचा पैसा बीसीसीआयला देणार नाही कारण त्यासाठी 6 कोटी लागणार होते. तर वर्ल्ड कपचं प्रसारण करण्यासाठी दुरदर्शनला त्यांची सिस्टीम अपग्रेड करावी लागणार होती. ज्यासाठी 30 कोटी लागणार होते. त्यामुळे त्यांनी रॉयल्टी द्यायला नकार दिला.

या दरम्यान एक चमत्कार झाला. सरकारने व्हिपी सिंहाना अर्थमंत्रिपदावरून हटवत संरक्षणमंत्री केलं. साळवेंनी या संधीच सोनं केलं. त्यांनी धीरूभाई अंबानींना फोन केला आणि वर्ल्ड कपच्या स्पॉन्सरशिपबद्दल विचारलं. त्यांनी होकार दिला आणि सगळ काही बदललं. अंबानींनी सरकारला आधी 4 कोटी दिले. तर 1.5 कोटींची टायटल स्पॉन्सरशिपही घेतली. त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं नाव रिलायन्स झालं. जसं की, भारत- पाकिस्तान वर्ल्ड कप समितीऐवजी रिलायन्स वर्ल्ड कप समिती नाव दिलं गेलं, वर्ल्ड कपचं नावही रिलायन्स वर्ल्ड कप ठेवण्यात आलं. त्यातून अंबानींचा रिलायन्सला वर्ल्ड ब्रॅंड बनवण्याचा हेतूही सफल झाला.

दरम्यान आणखी एक चमत्कार झाला. दुरदर्शनही वर्ल्ड कपच्या प्रसारणासाठी सिस्टीम अपग्रेडेशनला 30 कोटी खर्च करायाला तयार झालं. मात्र त्यांनी रॉयल्टी ऐवजी टीव्हीवरील जाहिरातींचा रिव्हेन्यू बीसीसीआयला शेअर केला. त्यातही बीसीसीआयने ग्राऊंड अॅडव्हटाईज चे हक्क ठेवले. ते देखील अंबानींनी खरेदी केले. त्यातून बीसीसीआयला आणखी पैसा मिळाला. अशाप्रकारे भारताने यशस्वीरित्या वर्ल्ड कपचं आयोजन केलं. त्यावर्षी भारत वर्ल्ड कप जरी जिंकू शकला नाही तरी देखील भारताने दाखवून दिलं होतं की, वर्ल्ड कपच्या आयोजनात भारतही मागे नाही.

Tags

follow us