World Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू अक्षर पटेल संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

  • Written By: Published:
World Cup 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू अक्षर पटेल संघातून बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारतात होणारा क्रिकेट विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरम्यान, वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या संघाबाबत एक मोठा अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Akshar Patel) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळं भारतीय संघाने हा निर्णय घेतला. संघात अक्षर पटेलच्या जागी अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनला (R. Ashwin) संधी मिळाली आहे.

आर अश्विनला वर्ल्ड कपसाठी इंडियाच्या टीममध्ये संधी मिळाली आहे. संघात स्थान मिळाल्यानंतर अश्विनचे ​​नशीब उजळले आहे. अश्विनची संघात अचानक एंट्री झाली आहे. टीम इंडियाचा अक्षर पटेल आशिया चषकादरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे अक्षर पटेल वर्ल्ड कपमधून बाहेर आहे. आता अक्षरच्या जागी अश्विनला संघात संधी मिळाली आहे. या आधी २०११, २०१५ आणि २०१९ च्या वर्ल्डकप संघात त्याची निवड झाली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी अश्विनने जानेवारी २०२२ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर अश्विनने तब्बल दीड वर्षानंतर टीम इंडियासाठी एक सामना खेळला. अश्विनची ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिरकी चांगलीच चालली. अश्विनने 2 सामने खेळले. या मालिकेत त्याने एकूण 4 विकेट घेतल्या.

दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक; बाप्पाची मूर्ती पाहून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले… 

विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या संघात अश्विनच्या जागी अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरचा समावेश करण्याबाबतही चर्चा होती. मात्र, विश्वचषकासाठी संघात अश्विनचे ​​नाव निश्चित झाले आहे.

एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान 46 दिवस चालेल, ज्यामध्ये 48 सामने खेळले जातील. पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

टीम इंडियाचा पहिला सामना कधी आहे?
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. दुसरा सामना 12 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याच वेळी, 16 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. तर कोट्यवधी क्रिकेटप्रेमी ज्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube