World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) आता अगदी जवळ येऊन ठेपलेली असतानाच ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला ऐनवेळी संघात बदल करावा लागला. डावखुरा फिरकीपटू एश्टन अँगर अजूनही दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता फलंदाज मार्नस लाबुशेन याला संधी मिळाली आहे. वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचे 15 खेळाडू फीट होते. संघाची घोषणाही झाली होती. मात्र या पथकातील डावखुरा फिरकीपटू एश्टन अँगर हा दुखापतग्रस्त होता. तो दुखापतीतून लवकर बरा होईल असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे त्याच्या जागेवर दुसऱ्या खेळाडूची निवड करावी लागली.
एकदिवसीय मालिका भारताने जिंकली, राजकोटमध्ये मॅक्स ‘वेल’ पुढे टीम इंडिया ‘फेल’
लाबुशेनला याआधी संघात घेतलेले नव्हते. कॅमरून ग्रीन दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याची जागी त्याला संधी मिळाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत लाबुशेन बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. त्याने या सामन्यात नाबाद 80 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. आता त्याला थेट वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली आहे. एश्टन अँगरच्या दुखापतीचा त्याला असा फायदा मिळाला आहे. लाबुशेनच्या एन्ट्रीने ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आता आधिक मजबूत झाली आहे.
टीम इंडियालाही धक्का
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल (Akshar Patel) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळं भारतीय संघाने हा निर्णय घेतला. संघात अक्षर पटेलच्या जागी अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनला (R. Ashwin) संधी मिळाली आहे. आधी त्याची वर्ल्डकपमध्ये निवड झाली नव्हती. मात्र अक्षरच्या दुखापतीचा त्याला असा फायदा मिळाला आहे.
आर अश्विनला वर्ल्ड कपसाठी इंडियाच्या टीममध्ये संधी मिळाली आहे. संघात स्थान मिळाल्यानंतर अश्विनचे नशीब उजळले आहे. अश्विनची संघात अचानक एंट्री झाली आहे. टीम इंडियाचा अक्षर पटेल आशिया चषकादरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे अक्षर पटेल वर्ल्ड कपमधून बाहेर आहे. आता अक्षरच्या जागी अश्विनला संघात संधी मिळाली आहे. या आधी २०११, २०१५ आणि २०१९ च्या वर्ल्डकप संघात त्याची निवड झाली होती. यानंतर आता अश्विन या संधीचे सोने करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.