एकदिवसीय मालिका भारताने जिंकली, राजकोटमध्ये मॅक्स ‘वेल’ पुढे टीम इंडिया ‘फेल’
IND vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चांगली सुरुवात भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. राजकोट वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला आहे. मात्र, रोहित ब्रिगेडने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
रोहितने गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. कोहलीने अर्धशतक झळकावले. याआधी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ऑस्ट्रेलियाने 352 धावा केल्या होत्या. त्यासाठी मिचेल मार्शने 96 धावांची शानदार खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 352 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया 286 धावांवर ऑलआऊट झाली. रोहित शर्माने 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराट कोहलीने 56 धावा केल्या. श्रेयस अय्यर 48 धावा करून बाद झाला.
छगन भुजबळांच्या पुतण्याकडे मुंबईची जबाबदारी, नवाब मलिकांना धक्का
टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 च्या आधी मालिका जिंकली असली तरी राजकोटमधील पराभव पचवणं सोपं नसेल. या सामन्यात भारताच्या मधल्या फळीचा कमकुवतपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. रोहित, कोहली आणि अय्यर यांच्या खेळी सोडल्या तर एकाही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. केएल राहुल 26 धावा करून बाद झाला.
सूर्यकुमार यादव 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजा केवळ 35 धावा करू शकला. वॉशिंग्टन सुंदरला सलामीची संधी मिळाली. तो केवळ 18 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने 40 धावांत 4 विकेट घेतल्या.
‘उबाठा’ची गळती सुरूच! आता 3 शिलेदार शिंदेंच्या गळाला, सीएम शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश
भारताकडून रवींद्र जडेजा 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जसप्रीत बुमराहने गोलंदाजीत 6 बळी घेतले. कुलदीप यादवने 2 बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णा आणि सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.