ICC ODI World Cup 2023 : आयसीसीच्या मेगा एकदिवसीय विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहतो आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीने आज गुरुग्राम येथे एका कार्यक्रमादरम्यान विश्वचषकासाठी शुभंकरचे अनावरण केले. यावेळी भारताची दोन अंडर-19 चॅम्पियन कर्णधार शफाली वर्मा आणि यश धुल उपस्थित होते.
आयसीसीने लॉन्च केलेल्या दोन शुभंकरमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. शुभंकर लॉन्च करण्यासाठी आयसीसीने चाहत्यांकडून सूचना मागवल्या होत्या. हे दोन्ही शुभंकर लैंगिक समानता आणि विविधतेचा संदेश देतात. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत एकदिवसीय विश्वचषक भारतातील 10 शहरांमध्ये होणार आहे.
टोमॅटोने पोळलेल्या सरकारचा कांद्यावर आघात! चाळीस टक्के निर्यात शुल्क
आयसीसीचे इव्हेंट्स हेड ख्रिस टेटली म्हणाले की, आम्हाला ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या आधी शुभंकर लाँच करताना आनंद होत आहे. हा शुभंकर संस्कृती आणि देशाच्या सीमा ओलांडून क्रिकेटचे प्रेम प्रतिबिंबित करतो तसेच एकतेचा संदेश देतो.
The two #CWC23 mascots are here 😍
Have your say in naming this exciting duo 👉 https://t.co/AytgGuLWd5 pic.twitter.com/7XBtdVmtRS
— ICC (@ICC) August 19, 2023
ख्रिस टेटली पुढे म्हणाले, हा शुभंकर आयसीसी आणि क्रिकेटला पुढच्या पिढीच्या क्रिकेट चाहत्यांना कनेक्ट करण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात भूमिका बजावतील. यावेळी ICC ने शुभंकर नामकरण स्पर्धेचे अनावरण केले. ही स्पर्धा 27 ऑगस्टपर्यंत चालेल आणि चाहत्यांना विश्वचषकावर आपली छाप पाडण्याची संधी देईल.
गोविंदांसाठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून 50 हजार गोविंदांना 10 लाखांचे विमाकवच
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारतात होणारा हा मेगा इव्हेंट देशातील 10 शहरांमध्ये आयोजित केला जाईल ज्यामध्ये 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल.