गोविंदांसाठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून 50 हजार गोविंदांना 10 लाखांचे विमाकवच
मुंबई : थरांचे विक्रम करण्यासाठी गोविंदांचे पथकं कसून सराव करत आहेत. दहीहंडी (Dahihandi) उत्सवादरम्यान थरावर थर करतांना अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुलं दहीहंडी समन्वय समितीने गोविंदाच्या विम्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली होती. समन्वय समितीच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर राज्य सरकारने राज्यातील दहीहंडी उत्सव आणि प्रो गोविंदा लीग दरम्यान गोविंदांना (Govinda) विमा संरक्षण (Insurance) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.
राज्य सरकारने शुक्रवारी एका शासन निर्णयाद्वारे 50 हजार गोविंदासाठी हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. हा निर्णय गोविदांसाठी दिलासादायक असल्यानं या निर्णयाचे कौतुक होत आहे.
ब्राह्मणांमध्ये शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही; भुजबळांनी टाकली ठिणगी
यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली असून 37 लाख 50 हजार रुपयांची रक्कम दहीहंडी समन्वय समितीला वितरित करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. 50 हजार गोविंदांना प्रतिगोविंदा 75 रुपये विमाहप्ता याप्रमाणे 37 लाख 50 हजार रुपयांचा निधी विमा कंपनीद्वारा अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयानुसार, अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख, दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास 10 लाख, एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास 5 लाख, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख, कायम अपूर्ण/ पक्षपाती अपंगत्व असल्यास विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारीनुसार मदत करण्यात येईल.
31 ऑगस्ट रोजी प्रो लिग स्पर्धा
2014 पासून प्रो लिग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार यावे, अशी मागणी होती. अखेर या मागणीला यश आलं. 31 ऑगस्ट रोजी प्रो लिग स्पर्धेचे आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे. या समितीस शासनाने मान्यता दिली आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेतचे आयोजन करण्यात येणार आहे.