टोमॅटोने पोळलेल्या सरकारचा कांद्यावर आघात! चाळीस टक्के निर्यात शुल्क
Onion export duty : केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क तात्काळ लागू केले आहे. हे शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. याबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी खाली येऊ शकतात.
सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरातही वाढ होण्याची शक्यता अनेक अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. कांद्याचा भाव 50 ते 60 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, निकृष्ट दर्जाच्या कांद्याचा मोठा वाटा याशिवाय, इतर भाज्यांची वाढलेली महागाई देखील कांद्याच्या दरात वाढ होण्यास कारणीभूत आहे.
राज्यावर दुष्काळाचे सावट! सरकार लागले तयारीला, वैरण, पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे निर्देश
गेल्या आठवड्यात सरकारने तात्काळ ऑक्टोबरमध्ये कांदा बाजारात आणण्याची घोषणा केली होती. सरकार ताबडतोब बफर स्टॉकमधून कांदा मार्केटमध्ये आणणार आहे. नवीन कांदा बाजारात येईपर्यंत भाव नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
टोमॅटोने सरकारला रडवले
देशात वाढलेल्या महागाईला टोमॅटो जबाबदार असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या किरकोळ किंमती बहुतेक शहरांमध्ये 200-250 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या होत्या. अलिकडच्या आठवड्यात टोमॅटोचे भाव काहीसे कमी झाले आहेत. पण टोमॅटोचे दर वाढल्याने केंद्र सरकारवर मोठी टीका झाली होती. सोशल मीडियात यावर मीम्स देखील आले होते.