World Cup 2023-PAK Vs NED : विश्वचषकाच्या (World Cup 2023) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. पाकने नेदरलँडचा 81 धावांनी पराभव केला. परंतु नेदरलँड्सचा चांगला खेळ दाखविला. नेदरलँडसने पाकिस्तान संघाला पूर्ण 50 षटके खेळी दिली नाहीत. पाक संघ 49 षटकात 286 धावांत गारद झाला. धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 205 धावांत गारद झाला. त्यामुळे पाकिस्तान संघ 81 धावांनी विजयी झाला. परंतु नेदरलँड्सच्या बॅस डी लीडने (Bas De Leede) अष्टपैलू कामगिरी केली.
World Cup 2023 : टीम इंडियाला झटका! शुभमन गिल पहिलाच सामना मुकणार?
त्याने पाकिस्तानला संघाचे चार फलंदाज बाद करण्याबरोबर अर्धशतकी खेळी केली आहे. विश्वचषकात (World Cup 2023) पाकविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या तो पहिला खेळाडू ठरला आहे. तर असा पराक्रम करणारा तो सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. पाककडून हॅरिस रऊफने तीन आणि हसन अलीने दोन बळी घेतले. शाहिन आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
बॅस डी लीडने गोलंदाजी करताना पाकिस्तानला जेरीस आणले. त्याने नऊ षटकांत 62 धावा देत चार फलंदाज बाद केले. त्याने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि हसन अली या चार फलंदाजांना बाद केले. त्याने चांगले फलंदाज बाद करत पाकिस्तानला जेरीस आणले. त्यामुळे पाकिस्तान संघ 49 षटकांत 286 धावांत गारद झाला. गोलंदाजीबरोबर बॅस डी लीडने फलंदाजीमध्ये जोरदार कामगिरी दाखविली. त्याने 67 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाकिस्तानचा गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने 6 चौकार आणि दोन षटकार मारले. मोहम्मद नावाजने बॅस डी लीडचा त्रिफळा उडविला. त्यानंतर पाकिस्तानला हा सामना जिंकता आला आहे. परंतु नेदरलॅंडस् च्या या खेळाडूने मात्र आता आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा संदेशच दिला आहे.
World Cup 2023 : बीसीसीआयची मोठी घोषणा! वर्ल्डकप सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मिळणार ‘ही’ सुविधा
त्यापूर्वी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मोहम्मद रिझवान आणि सऊद शकीने अर्धशतके झळकविली. दोघांना प्रत्येकी 68-68 धावांची खेळी केली. मोहम्मद नवाजने 39 आणि शादाब खानने 32 धावांची खेळी केली. हारिस रऊफने 16, इमाम उल एकने 15, शाहीन आफ्रिदीने नाबाद 13 आणि फखर जमानने 12 धावा केल्या आहेत. इफ्तिखार अहमद नऊ आणि कर्णधार बाबर आझम पाच धावा करूच शकला. हसन अलीला तर खातेही उघडता आले नाही.