World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये रोमहर्षक लढत झाली. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. आफ्रिकेचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आला आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा डाव 46. 4 षटकांत 270 धावांवर आटोपला. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने 91 धावांची खेळी केली. एकवेळ आफ्रिका हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. परंतु 250 धावांवर आफ्रिकेने आठ विकेट्स गमविल्या होत्या. त्यानंतर नववी विकेटही पडली. परंतु केशव महाराज आणि तबरीज शम्सी यांनी शेवटच्या गड्यासाठी झुंजार खेळी करत संघाला विजय मिळविला आहे. केशव महाराजने 21 चेंडूचा सामना करत सात धावा केल्या आहेत. तर शम्सीने 4 धावा केल्या आहेत.
Devendra Fadnavis video : ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडिओ भाजकडून डिलिट, भाजपने केली सारवासारव
आजचा सामना रोमहर्षक झाला. 271 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेसमोर अनेक संकटे उभे राहिले. शेवटच्या दहा षटकात आफ्रिकेला विजयासाठी वीस धावांची गरज होती. 40 षटकांत 249 धावांत सहा विकेट्स आफ्रिकेच्या पडल्या होत्या. एडन मार्करम हा 91 धावांवर खेळत होता. पण शाहीन शाह आफ्रिदीने मार्करमला बाद करत सामना फिरविला. तर दुसऱ्याच चेंडूवर गेराल्ड कॉट्जी बाद झाला. 250 धावांवर आफ्रिकेचे आठ फलंदाज बाद झाले. त्यामुळे हा सामना एकदमच रोमहर्षक झाला. परंतु शेवटच्या विकेट्ससाठी केशव महाराज आणि शम्सीने झुंजार खेळी करत संघाला सामना जिंकून दिला आहे. क्विंटन डिकॉक 14 चेंडूत 24 धावा केल्या आहेत. तेंबा बावुमाने 28 धावा केल्या. डेविड मिलरने 29 धावा केल्या.
MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश
प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली. अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक हे अपयशी ठरले. कर्णधार बाबर आझमने अर्धशतक झळकविले. परंतु तो बाद झाला. सऊद शकीने 52, शादाब खानने 43 आणि मोहम्मद रिजवानने 31 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकी गोलंदाज शम्सी 60 धावांत चार बाद झाले. मार्को यानसनने तीन, तर गेराल्ड कॉट्जी दोन बाद केले.