World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा फरक एवढा मोठा होता की, ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला तब्बल 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यामध्ये नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला आहे. या विजयाचा ऑस्ट्रेलियाला तर फायदा झालाच त्याचबरोबर आणखी तीन संघांचाही फायदा झाला. या विजयामुळे गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर कायम असला तरी संघाचा रनरेट मायनसमधून प्लसमध्ये बदलला गेला आहे. तसेच या विजयामुळे इग्लंड, श्रीलंका आणि बांग्लादेश या तीन संघांचाही फायदा झाला आहे. या तिन्ही संघांचे दोन-दोन गुण होते. आता तिन्ही संघांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत.
नेदरलँड्सचा संघ मात्र तळाला गेला आहे. सध्या हा संघ सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. याआधी बांग्लादेश या क्रमांकावर होता. भारत गुणतालिकेत टॉपवर आहे. या संघाने अद्यापर एकही सामना गमावलेला नाही. साउथ आफ्रिका दुसऱ्या तर न्यझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे समान म्हणजेच 8 गु्ण आहेत. पण, आफ्रिकेच्या संघाचा रनरेट चांगला असल्याने दुसरा क्रमांक मिळाला आहे. पाकिस्तान चौथ्या तर अफगाणिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांचे चार-चार गुण आहेत. पाकिस्तान टीमचा सलग तीन सामन्यात पराभव झाला आहे.
या समान्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅक्सवेलने दमदार खेळी केली. त्याने यावेळी नेदरलॅंड्सच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत अवघ्या 40 चेंडूत शतक केले. तर 44 चेंडूंमध्ये तो 106 धावांवर पोहचला. यात त्याने 9 चौकार आणि 8 षटकार लगावले. त्यामुळे त्याचा एक विक्रम झाला आहे. मॅक्सवेल आता विश्वचषकात सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला आहे. यावेळी डेव्हिड वॉर्नरनेही शतक केले. तर स्मिथनेही महत्त्वाची खेळी केली.
World Cup 2023 : ‘पाकिस्तान पुढील सामन्यात जिंकूच नये’; कॅप्टन आझमचा ‘काका’च भडकला
तर नेदरलॅंड्स बद्दल सांगायचे झाले तर त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या 400 धावांच्या आव्हाला पेलताना 21 षटकांत 90 धावा करून सर्वबाद झाले. यात सलामीवीर विक्रम जीत सिंगने 25 चेंडूत 25 धावांची खेळी केली. तर कॉलिन अकरमनने 11 चेंडूत 10 धावा, एंगलब्रेटने 21 चेंडूत 11 धावा केल्या अशा कामगिरीमुळे नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला.