Download App

WTC Final: ‘तो एक दिग्गज, पण प्रशिक्षक म्हणून झिरो…’, माजी पाक क्रिकेटरचा राहुल द्रविडवर हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

WTC Final: भारतीय संघ सध्या लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळत आहे. या सामन्याला तीन दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत टीम इंडिया बॅकफूटवर दिसली आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने ( Basit Ali) राहुल द्रविडवर जोरदार हल्ला चढवला आहे. (wtc-final-2023-former-pakistani-player-basit-ali-on-indian-head-coach-rahul-dravid-he-is-legend-but-zero-as-coach)

बासित अली म्हणाले की, प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पूर्णपणे झिरो आहे. वरती शहाणपण वाटून घेत असताना राहुल द्रविड कुठे डोंगरामागे लपला होता. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला, “नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतानाच भारताने सामना गमावला. ज्या प्रकारची गोलंदाजी पाहिली ती आयपीएलसारखी होती. लंचपर्यंत भारतीय गोलंदाज इतके आनंदी दिसत होते की जणू त्यांनी सामना जिंकला आहे.”

माजी पाकिस्तानी क्रिकेटर पुढे म्हणाला, 120 षटकांमध्ये मला फक्त 2-3 खेळाडू तंदुरुस्त दिसले – रहाणे, कोहली आणि जडेजा. बाकी सगळे थकलेले दिसत होते.”

Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार

प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड शून्य: बासिल अली

माजी पाकिस्तानी खेळाडू बासित अली पुढे म्हणाले, “मी राहुल द्रविडचा खूप मोठा चाहता आहे, नेहमीच होतो आणि राहणार आहे. तो एक मोठा खेळाडू आहे. पण प्रशिक्षक म्हणून तो पूर्णपणे शून्य आहे.

Tags

follow us