जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत सध्या पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानने एकूण 24 गुण मिळवले आहे. यासोबतच पाकिस्तान संघ 100 गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. (wtc points table 2023 25 after england vs australia ashes series pakistan at top indian 2nd)
भारताने WTC च्या नवीन आवृत्तीची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने केली. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला. या टप्प्यावर, भारतीय संघाचे एकूण 16 गुण आहेत आणि त्यांच्या गुणांची टक्केवारी 66.67 आहे. त्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिका 2-2 ने बरोबरीत संपली. या कसोटी मालिकेतील पहिले 2 सामने ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले होते. यानंतर तिसरा आणि पाचवा सामना जिंकत इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडची भक्कम पकड होती, पण पावसामुळे ही कसोटी अनिर्णित राहिली.
IND vs WI : टीम इंडिया सुसाट! तिसऱ्या वनडेत मोठा विजय, मालिकाही जिंकली
ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर
ऍशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघ 26 गुणांसह WTC च्या सध्याच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यामध्ये संघाच्या गुणांची टक्केवारी 43.33 आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघही 43.33 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने आतापर्यंत 5-5 कसोटी सामने खेळले असून 2-2 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिज संघ 16.67 गुणांच्या टक्केवारीसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.