Virat Kohali : विराट कोहली 2019 ते 2022 मध्ये त्याच्या खराब फॉर्मशी झगडत होता. एक काळ असा होता की विराट कोहली (Virat Kohali) प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या सामन्यात शतक झळकावायचा. पण या तीन वर्षांत विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक कोणत्याही फॉरमॅटमध्ये आलेलं नाही. पण असं म्हणतात की जेव्हा एखादा मोठा खेळाडू पुनरागमन करतो, तेव्हा तो आणखी धोकादायक बनतो.
असाच काहीसा प्रकार विराट कोहलीच्या बाबतीत घडला आहे. 2022 च्या टी20 आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आणि त्यानंतर त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये धावा काढल्या. 2023 हे वर्ष विराट कोहलीसाठी अतिशय संस्मरणीय वर्ष होते. या वर्षी विराट कोहलीने 2000 हून अधिक धावा, 8 शतके, 10 अर्धशतके, विश्वचषकात सर्वाधिक धावा यासह अनेक खास विक्रम केले आहेत. 2023 मध्ये विराट कोहलीने केलेल्या विक्रमांबद्दल पाहूया.
2023 मध्ये विराट कोहलीची कामगिरी
– 2048 धावा केल्या.
– 10 शतके केली.
– 8 अर्धशतके झळकावली
– ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या.
– आयपीएलमध्ये 639 धावा केल्या.
– विश्वचषकात सर्वाधिक 765 धावा.
– एकाच विश्वचषकाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
– सचिन तेंडुलकरचा वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला.
– विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये 50 वे शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.
– बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा.
Year Ender 2023: इम्पॅक्ट प्लेअर ते टाइम आउट, ‘या’ नवीन नियमांनी क्रिकेट बदलले
2023 मध्ये 2000 पेक्षा जास्त धावा केल्या
विराट कोहलीने 2023 मध्ये एकूण 36 डाव खेळले आहेत. या 36 डावांमध्ये कोहलीने एकूण 2048 धावा केल्या आहेत. या काळात कोहलीची सरासरी 66.06 राहिली आहे. 2023 मध्ये विराट कोहलीने एकूण 8 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत.
Year Ender 2023: हाता तोंडाशी आलेला खास हिसकावला, एकाच वर्षात तीनदा रडवले
याशिवाय विराट कोहलीने IPL 2023 मध्ये शुभमन गिलनंतर सर्वाधिक 639 धावा केल्या आहेत. 2023 च्या विश्वचषकातही विराट कोहलीने 11 सामन्यांमध्ये 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या, यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. यासाठी विराट कोहलीला प्लेअर ऑफ द वर्ल्ड कपचा किताबही मिळाला.