Year Ender 2023: हाता तोंडाशी आलेला खास हिसकावला, एकाच वर्षात तीनदा रडवले
Year Ender 2023: हे वर्ष भारतीय खेळ जगतासाठी ऐतिहासिक राहिले. स्टार अॅथलीट नीरज चोप्राने हे वर्ष चांगले गाजवले. भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asia Cup 2023) पदाकांचे शतक पूर्ण केले. महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी राखली. वर्षभरात एकदिवसीय (World Cup 2023) आणि टी-20 मालिकेतही चांगली कामगिरी केली परंतु दोन सामन्यांतील पराभवाने लाखो हृदय तुटले. याशिवाय आणखी एक असा प्रसंग आला, जिथे भारत इतिहास रचता रचता राहिला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जेतेपदाचे स्वप्न भंगले
भारताला कसोटीत विश्वविजेते होण्याची पहिली संधी होती. इंडियन प्रीमियर लीगनंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडला पोहोचला होता. तिथे भारताची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाशी लढत होती. सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचे स्वप्न उराशी बाळगून टीम इंडिया तिथं पोहचली होती. याआधी न्यूझीलंडने त्याचा पराभव केला होता. यावेळी रोहित शर्मा कर्णधार असल्याने काही करिष्मा होईल असे मानले जात होते, पण तसे झाले नाही.
ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने 209 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत प्रथमच विजेतेपद पटकावले. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 8 बाद 270 धावा केल्या होत्या. या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारत 234 धावांवर गारद झाला होता.
Year Ender 2023: भारताने मैदान गाजवले, आशियाई क्रीडा स्पर्धेत गाठली नवीन उंची
सलग 10 विजय, पण विश्वचषकाचे विजेतेपद हुकले
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील फायनल सामना कोण विसरेल? भारतीय संघाने साखळी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग 10 सामने जिंकले. स्वींग, फिरकी आणि फलंदाजीसमोर बड्या टीमची अवस्था वाईट झाली होती, पण जेतेपदाच्या सामन्यात ज्याची भीती वाटत होती तेच घडले.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. येथेही ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची नाबाद खेळी करत भारताचे स्वप्न भंगले.
Year Ender 2023: इम्पॅक्ट प्लेअर ते टाइम आउट, ‘या’ नवीन नियमांनी क्रिकेट बदलले
प्रज्ञानंदचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले
ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदने बुद्धिबळात विलक्षण कौशल्य दाखवून प्रसिद्ध फॅबियानो कारुआनाला पराभूत करून FIDE विश्वचषक अंतिम फेरी गाठली. मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत त्याने चमकदार कामगिरी केली, पण त्याला विजय मिळवता आला नाही. जागतिक पटलावर आपल्या नावाचा ठसा उमटवण्यात त्याला यश आले. पुढच्या वेळी प्रज्ञानंद हे काम पूर्ण करण्यात यशस्वी होतील अशी आशा आहे.