Karuna Sharma-Munde On Dhananjay Munde: माजी मंत्री व अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma-Munde) यांच्या पोटगीच्या दावावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची मी पहिली पत्नी असल्याचे पुरावे सादर केले. परंतु हे पुरावे खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय. तर करुणा शर्मा-मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक खळबळजनक आरोप केलाय. मला जो प्रेमात अडकून लग्न करेल, त्याला वीस कोटी रुपयांची ऑफर धनंजय मुंडे यांनी दिली होती, असा आरोप करुणा मुंडे यांचा आहे.
मोठ-मोठ्या डायरेक्टरने मला चित्रपटात हिरोईनच्या रोलची ऑफर दिली. परंतु मी मोठ्या ऑफर सोडून पतीबरोबर राहिले. आज माझ्या बदनामीचा कट रचला जात आहे. प्रत्येकी दिवशी मला त्रास दिला जात आहे. मला जेलमध्ये टाकणे. घराकडे गुंड पाठविणे. घरासमोर पोलिस उभे करणे. कधी माझ्यामागे माणसे सोडणे. माझ्याबरोबर लग्न करणाऱ्याला वीस कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. माझा पती धनंजय मुंडे आणि त्यांच्याबरोबर असलेले दलाल राजेश घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि तेजस ठक्कर या सर्व दलालांनी मला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्न करणाऱ्याला वीस कोटी रुपये देण्याचे ठरले होते, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केलाय.
करुणा शर्मा यांची कागदपत्रे खोटी
करुणा मुंडे यांच्याकडून कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करण्यात आले. हे सर्व पुरावे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी धुडकावून लावले आहेत. त्यांनी सादर केलेले सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय. वसियतनामा, स्वीकृतीपत्रात धनंजय मुंडे यांच्या वेगवेगळ्या सह्या आहेत. काही ठिकाणी अंगठा लावलाय, असे धनंजय मुंडे यांचे वकील अॅड. सायली सावंत यांचे म्हणणे आहे. तसेच करुणा मुंडेंचा पासपोर्ट बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे रेशनकार्ड इंदौरमध्ये कसे काय असे शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
मीच पहिली पत्नी-करुणा शर्मा
धनंजय मुंडे यांची यांची मी पहिली पत्नी आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी पुरावे सादर केलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्याबरोबर फिरलेले आहेत. माझ्यावरती प्रेम होते. तुम्ही त्यांचे पासपोर्ट बघा. माझे व्हिसा लावलेले आहेत. जग आम्ही फिरून आलेलो आहोत. 1998 मध्ये लग्न केलेले आहे. राजश्रीच्या कोणत्या कर्जाला धनंजय मुंडे गॅरेंटर नाही. परंतु माझ्या कर्जावर ते गॅरेंटर आहेत. राजश्री आणि धनंजय मुंडे यांचे एकत्रित बँक खाते नाही. माझे आणि धनंजय मुंडे यांचे एकत्रित खाते आहे, असे करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.