Download App

देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, कार्यालय फलकाची शहरात रंगली चर्चा

Devendra Fadnavis : भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या अहिल्यानगर भाजप (Ahilyanagar BJP) कार्यालयाचा फलक

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या अहिल्यानगर भाजप (Ahilyanagar BJP) कार्यालयाचा फलक सध्या नगरकरांचा चर्चेचा विषय बनला आहे. 6 एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिवस असून स्थापना दिनाच्या औचित्याने अहिल्यानगर महानगर कार्यालयाच्या दर्शनी भागात नवा फलक लावण्यात आला आहे.

या नव्या फलकावर “भारतीय जनता पार्टी, अहिल्यानगर महानगर” असे नाव असून एका बाजूला भाजपाचे कमळ चिन्ह तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो लावण्यात आला आहे. परंतु या फलकावर तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये कुठेही राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) , राष्ट्रीय नेते अमित शहा (Amit Shah) , राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे फोटो नसल्याने सद्या नगर शहरात या फलकाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या नव्या फलकावरुन निष्ठावंत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज पाहायला मिळाली. आजचा दिवस ज्यांच्यामुळे पाहायला मिळतोय किमान त्या नेत्यांचे फोटो लावणे गरजेचे असल्याचे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळाले.

आम्ही एअर इंडियाच्या चेअरमनला मारले वॉचमनला नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

सध्या भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणुकीचे वारे वाहत असून लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांसह जिल्हा व शहर अध्यक्षांच्या निवडी होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर फलकावर केवळ देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण, लायसन रद्द करा अन्…, भिसे कुटुंबियांची CM फडणवीसांकडे मागणी

follow us