Download App

अमित शाह यांच्या ताफ्यात शिरला दुचाकीस्वार, पोलिसांनी घेतले ताब्यात

  • Written By: Last Updated:

Bike Rider Entered Amit Shahs Convoy : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दोन दिवसाच्या मुबईच्या दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांचा ताफा मुबई विमानतळावरून सह्याद्री अतिथी गृहाकडे असताताना एक दुचाकीस्वार अचानक अमित शाह यांच्या ताफ्यात शिरला. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून लगेच त्याला सोडून दिले.

शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस अमित शाह मुबई दौऱ्यावर आहेत. रविवारी, शाह खारघर येथे 76 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते आणि सुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान) प्रदान करतील. या सत्कार समारंभात रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून लाखो लोक धर्माधिकारी यांना पाठिंबा देणार असल्याचे नवी मुंबई पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्रीपासून मुंबईतील सहार, कुलाबा, विलेपार्ले, खेरवाडी, वाकोला, वांद्रे, वरळी, गमदेवी, डीबी मार्ग, मरीन ड्राईव्ह, कफ परेड आणि मलबार हिल या विमानतळ परिसरात येणाऱ्या भागात पोलिसांचे फ्लाईंग सुरू होते. स्टेशनमध्ये ड्रोन, पॅराग्लायडर, फुगे, पतंग आणण्यास परवानगी नाही.

बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये 14 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अन्य नेत्यांनी विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत केले. शाह यांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर आहे.

मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणणीतीसह राज्यातील महत्वाच्या घडामोडींचा वेध घेणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभाव मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणणीतीवर देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शाह चर्चा करणार आहेत. शाह यांचे आगमन होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अन्य नेत्यांनी विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत केले.

Tags

follow us