Download App

‘म्हणून…’ स्वप्नील जोशी साजरा करतोय वर्किंग बर्थडे!

Actor Swapnil Joshi 46 Birthday : मराठी मनोरंजन विश्वात चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला स्वप्नील जोशी (Swapnil Joshi Birthday). मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता स्वप्नील जोशीची रोमॅंटिक हिरो म्हणून ओळख (Swapnil Joshi) आहे. आज स्वप्नील जोशी 46वा वाढदिवस साजरा करतोय. परंतु यंदा स्वप्नील जोशी अत्यंत खास पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत आहे. 2024 वर्षाची हाऊसफुल्ल सुरुवात स्वप्नील जोशने केली. म्हणूनच यंदाचा वाढदिवस तो थोडा वेगळा साजरा करताना दिसतोय ! स्वप्नील आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय, पण तो वर्किंग बर्थडे असल्याचं कळतंय. स्वप्नीलच हे वर्ष हाऊसफुल्ल असणार तर आहे आणि तितकच खास देखील आहे.

अभिनयाच्या सोबतीने निर्मिती विश्वात पदार्पण करून “नाच गं घुमा” सुपरहिट करून स्वप्नील आता आगामी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त आहे. स्वप्नीलचा हा वर्किंग बर्थडे कसा आहे? याबद्दल बोलताना स्वप्नील म्हणतो ” वाढदिवस असला तरी काम देखील तितकच महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आवडीचं काम करून मी हा दिवस स्पेशल करणार आहे.
प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! नवरा माझा नवसाचा 2″ पोहचला पाचव्या आठवड्यात

अनेक कामाच्या कमिटमेंट असल्याने हा खास दिवस माझं आवडीचं काम करून मी पूर्ण करणार आहे. स्वप्नील येणाऱ्या काळात वैविध्यपूर्ण भूमिका आणि विषय हाताळताना दिसणार आहे. जिलबी, सुशीला- सुजित आणि अनेक चित्रपटाचा भाग होणार आहे. सध्या स्वप्नील अभिनय आणि निर्मिती दोन्ही विश्वात तो काम करताना दिसतोय आणि येणाऱ्या काळात तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत स्वप्नीलने अनेक मराठी-हिंदी मालिका, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केलंय.

‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच! ‘या’ तारखेला मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित

कॉमेडीसाठी लोकप्रिय असलेला ‘चॉकलेट बॉय’ आज 46 वर्षांचा झालाय. स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीमधील एक आघाडीचा अभिनेता आहे. स्वप्नील जोशीचे ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, पक पक पकाक, व्हेंटिलेटर, शाळा हे चित्रपट सुपरहिट झालेत. तर ‘श्रीकृष्ण’, ‘रामायण’, ‘एक लग्न चाय भाई साहित्य’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांत देखील स्वप्नीलने काम केलंय. यंदा मात्र स्वप्नील त्याचा वर्किंग बर्थडे साजरा करत आहे.

 

follow us