प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! नवरा माझा नवसाचा 2″ पोहचला पाचव्या आठवड्यात

प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!  नवरा माझा नवसाचा 2″ पोहचला पाचव्या आठवड्यात

Navra Maza Navsacha 2 reached in fifth week : “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट (Navra Maza Navsacha 2) 20 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता पाचवा आठवडा सुरु झालाय. अगदी सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली (Marathi Movie) होती. घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर आली. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची अजूनच आतुरतेने वाट पाहू लागले. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल २१ कोटींपेक्षा देखील अधिक गल्ला जमवला आहे.

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केलीय. तर कथा – पटकथा आणि दिग्दर्शन हे सचिन पिळगांवकर यांनी केलंय. या चित्रपटाचे संवादलेखन संतोष पवार यांनी (Navra Maza Navsacha 2 Box Collection) केलंय. अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, अभिनेते सचिन पिळगांवर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभलेली आहे.

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च

चित्रपटात नेमकं आहे तरी काय?

नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा केंद्रबिंदू नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास आणि त्यात होणाऱ्या गमतीजमती आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना देखील हे सरप्राइज आवडलं आहे, बरं का! थिएटरमध्ये एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा गणपतीपुळेला निघालेल्या प्रवासाने गर्दी केलीय. नक्कीच मराठी सिनेसृष्टीसाठी ही एक आनंदाची बाब आहे.

Taal movie: सुपरहिट ‘ताल’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण; अभिनेता अनिल कपूरकडून आठवणींना उजाळा

हा सिनेमा रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची चांगली दाद या चित्रपटाला मिळतेय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली होती. चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये नवस आणि बसचा प्रवास होता तर या चित्रपटाच्या या दुसऱ्या भागात नवर आणि ट्रेनचा प्रवास यामधील मजेदार घटना दाखवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता हा चित्रपट पाचव्या आठवड्यात पोहोचलाय, त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट पडत असल्याचं पाहायला मिळतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube