Navra Maza Navsacha 2: …आणि म्हणून प्रसाद ओक यांनी केलं स्वप्नील जोशीच खास कौतुक

Navra Maza Navsacha 2: …आणि म्हणून प्रसाद ओक यांनी केलं स्वप्नील जोशीच खास कौतुक

Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ (Navra Maza Navsacha 2) नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने सुपरहिट ब्लॉकबस्टर कमाई केली. स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुप्रिया- सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, हेमल इंगळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दमदार कमाई करून सगळीकडे हाऊसफुल्ल ठरलेला ‘नवरा माझा नवसाचा 2’ प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडला पण अनेक बड्या स्टार्सनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केले आहे.

अभिनेता – दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak) यांनी स्वप्नीलला त्यांचा सोशल मीडिया वरून खास शुभेच्छा देऊन चित्रपटाच कौतुक केलं प्रसाद ओक म्हणतात स्वप्नील जोशी ‘नवरा माझा नवसाचा 2 बंपर विक इंड अभिनंदन भावा’ अश्या आपुलकीच्या शब्दात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकार मित्राचं कौतुक करून त्याचा चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या तर स्वप्नील जोशीने देखील दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक यांच्या आगामी ‘धर्मवीर 2’ साठी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपट विश्वात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची पाठ थोपटून शुभेच्छा तर दिल्या पण आपल्या मित्राच्या चित्रपटासाठी एका कलाकाराने त्याला देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र देखील हे यातून कळून येतंय. वेगवेगळ्या विषयांवर यावर्षात अनेक दमदार चित्रपट येत असले तरी आता स्वप्नील आणि प्रसाद ही जोडी प्रेक्षकांना ऑन स्क्रीन एकत्र बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही. ‘नवरा माझा नवसाचा 2’ नंतर स्वप्नील अनेक कमालीच्या चित्रपटात अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होत आहे.

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर 3’ मध्ये काय असेल? प्रसाद ओक स्पष्टच बोलला, म्हणाला- ‘लोकांना वाटतं…’

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. 1000 पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला 600 पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल होते. वीकेंडला 7.84 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube