Anti Immigration March in London : युरोपातील देशांत अशांतता धुमसू लागली आहे. आशिया आणि अमेरिकेतील देशांप्रमाणे युरोपातील देशांतही लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. मागील आठवड्यात फ्रान्समध्ये राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांच्याविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. जाळपोळ केली. यानंतर ब्रिटनची राजधानी लंडनही धुमसू लागले आहे. लंडनमध्ये शनिवारी इतिहासातील सर्वात मोठे आंदोलन झाले. येथे एक लाखांपेक्षा जास्त आंदोलकांनी स्थलांतरविरोधी कार्यकर्ते टॉमी राबिन्सन यांच्या नेतृत्वात रॅली काढली. या रॅलीली नंतर हिंसक वळण लागले. या दरम्यान काही पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनायटेड द किंगडम मार्च नावाच्या या कार्यक्रमात लोक लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
टॉमी रॉबिन्सनच्या नेतृत्वात शनिवारी ही रॅली काढण्यात (Anti Immigration March in London) आली होती. यावेळी काही समर्थकांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला. रॉबिन्सन यांच्या ‘युनायटेड द किंगडम’ मार्चला शेजारीच आयोजित करण्यात आलेल्या ‘स्टँड अप टू रेसिज्म’ या दुसऱ्या आंदोलनापासून वेगळे (Britain News) ठेवण्यात आले होते. या आंदोलनात जवळपास पाच हजार लोक सहभागी झाले होते.
आंदोलकांचे थेट पोलिसांवर हल्ले
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितले की युनायटेड द किंगडम रॅलीदरम्यान अनेक पोलिसांवर हल्ले झाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने अतिरक्त दल तैनात करण्यात आले होते. या दरम्यान नऊ लोकांना अटक करण्यात आली. आणखीही काही हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. यानंतर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. आंदोलकांनी पोलिसांवर थेट हल्ले केले. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी अतिरिक्त दल तैनात करावे लागले. यात सुरक्षा उपकरणे परिधान केलेले अधिकारी आणि घोडेस्वारांच्या तुकड्याही होत्या.
खरंतर स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या हॉटेल्सच्य बाहेर आंदोलन करून या मोठ्या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही जणांनी ‘सेंड देम होम’ असे लिहिलेले बॅनर हातात घेतले होते. काही जणांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याशी संबंधित ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.
Britain news : ब्रिटनमध्ये राहता वरून नावं ठेवता; सुनक यांनी ब्रिटनमधील स्थलांतरितांना सुनावलं