Arjun Khotkar On Fund : महाविकास आघाडीच्या सरकारच्या (MVA) काळात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विकास निधी देतांना शिवसेनेला सतत डावलले, असा आरोप करत एकनाथ शिंदेंसह ४० आमदार बाहेर पडले. आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता भाजपकडूनही (BJP) शिंदे गटाला निधी वाटपात डावण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केला. (Arjun Khotkar alleged BJP over allocation of funds)
आगामी 2024 च्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. तेव्हा आमदार-खासदारही आपापल्या मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. मात्र, विकासनिधीच मिळत नसल्याची ओरड आता शिंदे गट करत आहे. याबाबत अर्जुन खोतकर म्हणाले की, काल आमचे कार्यकर्ते निधी न मिळाल्याबद्दल जाब विचारण्यासाठी अतुल सावे यांच्याकडे गेले होते. पण त्यांना जाब विचारून काही झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही सुत्री ठरवून दिली आहे, त्याप्रमाणे खालचे लोक वागत नाहीत.
Pune News : वैद्यकीय महाविद्यालयाचा डिनच निघाला लाचखोर! 10 लाख घेताना पकडलं…
खोतकर यांनी सांगितलं की, सावे यांनी निधी दिल्याचा दावा केला आहे. पण जर खरचं निधी मिळाला असेल तर त्यांनी ते सिद्ध करावे. निधी बाबत सांगितलं वेगळं जातं आणि प्रत्यक्षात निधी वेगळा दिला जातोय. त्यांनी आम्हाला 7 कोटींचा निधी दिला. शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला 40 ते 45 कोटींचा निधी मिळायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी सात-आठ कोटी देऊन आम्हाला गुडाळलं, त्यामुळं हा सर्व प्रकार निश्चितच राग आणणारा असल्यानं आमचे लोक जाब विचारण्यासाठी गेले होते, असं खोतकर म्हणाले.
ते म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, काल ते जेजुरीत असल्याने बोलणे शक्य झाले नाही. पण, मी योग्य माध्यमातून त्यांच्या कानावर हा विषय घालणार आहे. इतर राज्यात काय परिस्थिती आहे माहीत नाही, पण जालना जिल्ह्यात निधी देतांना भाजकडून शिवसेनेला (शिंदे गट) डावलण्यात जात आहे. आम्ही निधी लोकांसाठी मागत आहोत. आमच्या घरांसाठी निधी मागत नाही. जे काही वरच्या पातळीवर ठरलं आहे, त्यानुसारच सर्व काही व्हायला पाहिजे, एवढीच आमची विनंती असणार असल्याचं खोतकर म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्याकडूनही निधीचा तिढा सुटला नाहीतर राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याची शक्यता आहे.