Asian Games 2023 : चीनमधील होंगझोऊमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) सुरू आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडू सुवर्ण कामगिरी करत आहेत. टीम इंडियाने आता आणखी एख गोल्ड मेडल जिंकले. भारताची अव्वल बॅडमिंटन जोडी चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विक साईराज (Satwik Sairaj) यांनी स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं सुवर्णपदक जिंकले. या जोडीने कोरियन जोडीचा 21 – 18, 21 – 16 असा पराभव केला.
शरद पवारांना विठ्ठल, दैवत म्हणणाऱ्यांना आव्हाडांचा सवाल; ‘हुकूमशहा’वरुन राजकारण तापलं
चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या दोघांनी पहिल्यांदाच बॅडमिंटन खेळात भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या पदकासह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 28 वर पोहोचली आहे. भारताने यावर्षी आशियाई खेळांमध्ये एकूण 100 हून अधिक पदेक जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी हे कोरियाच्या चोई आणि किम वोनहो यांच्याविरुद्धच्या अंतिम सामन्यात पहिल्या गेममध्ये पिछाडीवर होते. त्यांना गोल्डमेडलसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. पहिल्या सामन्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले. त्यांनी पहिला गेम 21-18 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कोरियन जोडीचे आव्हान 21-16 असे परतवून लावत सुवर्णपदकावर नाव कोरल.
जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सध्या तिसऱ्या क्रमांकावर असलेली ही भारतीय जोडी पुढील आठवड्यात क्रमवारी अपडेट झाल्यानंतर अव्वल स्थानावर जाईल. ते इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रेन अरादिंटो यांचे अव्वल स्थान मिळवेल.
भारताने आज आपली पदकांची संख्या 100 व्या नेली आहे. आर्चरीमध्ये ओजस देवताळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी सुवर्णपदक पटकावले. यासह आदिती स्वामीने कांस्यपदक जिंकले. याशिवाय, भारताने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही केला. त्यांनी 9 पदके जिंकली. भारताने यापूर्वी 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन पदके जिंकली होती.