Devendra Fadnavis : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सत्ताधारी भाजपसह (BJP) विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार उलथवून टाकण्यात मोठी बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही दिल्लीत पाठवलं जाणार अशी चर्चा सुरू आहे. यावर खुद्द फडणवीसांनी भाष्य केलं.
दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका
फडणवीस हे गेल्या काही वर्षात राज्यात भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून उदयास आले आहेत. त्यामुळं फडणवीसांनी लोकसभेची निवडणूक नागपूरमधून लढवावी, अशी केंद्रीय नेतृत्वाची इच्छा असल्याचं सांगितल्या जातं. दरम्यान, तुम्ही दिल्लीला जाण्यासाठी उत्सुक आहात का? की फक्त महाराष्ट्रातच काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट अशी की, पक्ष जेव्हा म्हणेल दिल्लाला यावं लागेल, तेव्हा मी दिल्लीला जाईन. ज्या दिवशी पक्ष म्हणेल की मुंबईत राहायचे आहे. तेव्हा मी मुंबईत राहीन. जेव्हा पक्ष म्हणेल, आता तुझी आवश्यकता नाही, तू नागरपूरला जा. तेव्हा मी नागपूरला जाईल, असं फडणवीस म्हणाले.
ते म्हणाले, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. माझ्याबाबत पक्षच निर्णय घेतो. मी स्वतः निर्णय घेत नाही. त्यामुळे मला माझ्या उत्सुकतेचा विषयच येत नाही, जी पतंगबाजी चालत आहे, त्यात काहीही सत्य नाही. पक्षाने असं कुणालाही म्हटलं नाही. शेवटी राजकीय वास्तविकतेला धरून अंतिम निर्णय घेतले जातात. राजकीय वास्तविकता हीच आहे की, माझ्या पक्षाने महाराष्ट्रात माझं नेतृत्व तयार केलं आहे. त्यामुळं मी आज महाराष्ट्राचा नेता आहे. ज्यादिवशी पक्षाला वाटेल दुसरा नेता तयार करायचा आहे, तेव्हा दुसरा नेता तयार केला जाईल, असं फडणवीस म्हणाले.
जोपर्यंत दुसरा नेता तयार केला जात नाही. तोपर्यंत मी महाराष्ट्राचा नेता असेल. तसंच मी जेवढं राजकारण समजतो. त्यावरून मला वाटत नाही की, पक्ष मला दिल्लीत बोलवेल. त्यामुळं मी महाराष्ट्रात काम करेन. महाराष्ट्रातचं काम मला दिलं जाईल. महाराष्ट्रात मी पुन्हा आमचं सरकार निवडून आणेल, असंही फ़डणवीस म्हणाले.