Download App

Election Result 2024 : महाराष्ट्राची कमान कोण सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढं?

महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • Written By: Last Updated:

Who will Maharashtra CM : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एनडीएने 235 जागांवर विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. यामध्ये भाजपच्या खात्यात 132 जागा गेल्या आहेत. तर, शिवसेनेला 57 जागा मिळाल्या. (Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 41 जागांवर विजय मिळवला. या विजयानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत रंगली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत.

दोन दिग्गजांत टक्कर

महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्ही सर्वजण मिळून निर्णय घेऊ. निवडणूक आम्ही एकत्र लढलो आणि निर्णयही सामूहिक असेल असं ते म्हणाले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री निवडीसंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितलं की, मुख्यमंत्री कोण होणार यावर कोणताही वाद नाही. निवडणुकीआधी ठरल्याप्रमाणे महायुतीतील सर्व नेते मिळून अंतिम निर्णय घेतील. हा निर्णय सर्वांसाठी मान्य असेल असंही ते यावेळी म्हणाले.

Prithviraj Chavan Defeat : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत

शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्टपणे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलं की, निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहर्‍यावर लढली गेली. मतदारांनी शिंदेंना प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा मान शिंदेंनाच मिळायला हवा. भाजपकडून मात्र देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढं केलं जात आहे. महाराष्ट्रात भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर फडणवीस यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक केंद्रीय नेते त्यांच्या घरी पोहोचले आणि विजय साजरा केला. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याच्या बाजूने भाजप कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे.

महायुतीत मतभेद?

महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची रस्सीखेच जरी सुरू असली तरी सर्व पक्ष सामंजस्याने निर्णय घेतील, असा दावा केला जात आहे. काही नेत्यांच्या मते, भाजपकडून तिसऱ्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये अजित पवारांच नाव येणार का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांची टक्कर तीव्र होणार आहे. महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रीपदासाठी कोण बाजी मारणार, याचा उलगडा लवकरच होईल.

follow us