ECIL Recruitment 2023: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) अंतर्गत अप्रेंटिस (apprentice) पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत एकूण 484 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमदेवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2023 आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
एकूण पदे– 484
पदांचा तपशील –
EM – 190
इलेक्ट्रीशियन – 80
फिटर- 80
R & AC-20
टर्नेर – 20
मशिनिष्ट – 15
मशिनिष्ट (जी)- 10
कोपा- 40
वेल्डर – 25
पेंटर – 04
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयातील ITI/NCVT.
वय श्रेणी –
या भरतीसाठी अर्ज करतांना उमदेवारांचे वय हे 18 ते 25 वर्ष असावं.
खुला प्रवर्ग – 18 ते 25 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारली, हुज्जतही घातली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अर्ज फी – या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
नोकरीचे ठिकाण – हैदराबाद.
कागदपत्रांची पडताळणी करण्याचे ठिकाण –
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर (सीएलडीसी), नालंदा कॉम्प्लेक्स, टीआयएफआर रोड, ईसीआयएल, हैदराबाद – 500 062. फोन नंबर 04027186454
ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 25 सप्टेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10ऑक्टोबर २०२३
उमेदवारांनी विहित तारखेपर्यंत अर्ज करावा आणि फॉर्म अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण चुकीचा भरलेला फॉर्म कोणत्याही परिस्थितीत उमेदवारासाठी स्वीकारला जाणार नाही. याशिवाय, कंपनी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1dfe8NvAl8hXTbNw8mlcOiq7zkplPXuPP/view
ECIL भरतीसाठी कसा अर्ज करावा-
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– मग लॉगिन करा. त्यानंतर तुमचा ECIL भर्ती फॉर्म भरा.
– फॉर्म भरतांना संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
– यानंतर फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.