Download App

अरुण तनपुरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; पुतणे प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेणार?

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे यांनी मोठा निर्णय घेतला.

  • Written By: Last Updated:

Arun Tanpure Joins NCP : माजी राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठा धक्का दिला आहे. डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन, तसंच बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि त्यांचे सुपुत्र व कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. (NCP) अरुण तनपुरे हे प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत.  आता यावर शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे काय भूमिका घेतात याककडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

नुकत्याच झालेल्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत तनपुरेंनी एकतर्फी विजय मिळवत कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याला नवसंजीवनीची आशा असल्याने सत्तेपासून दूर राहून चालणार नाही, असा समज असल्याने गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे हे अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा होती, त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

तनपुरे कारखाना बंद पाडणारे पडद्यामागचे सूत्रधार तेच; विखे-कर्डिलेंवर तनपुरेंचे गंभीर आरोप

या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी महत्त्वपूर्ण शिष्टाई केली. प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढील आठवड्यात अरुण तनपुरे यांचे समर्थक व स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा सामूहिक अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते असलेले अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने प्राजक्त तनपुरे यांची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us