Download App

Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं

  • Written By: Last Updated:

Gulabrao Patil Said Further red zone, Uddhav Saheb was warned : गेल्या नऊ महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (shiv sena) बंडाळी केली. त्यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन हे बंड केलं होतं. त्यामुळं ठाकरे सरकार अल्पमतात आलं होतं. अखेर विश्वासदर्शक ठरावाच्या आधीच तत्कालीन सीएम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जाऊन राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. पण, अजुनही शिंदे गटाच्या या बंडामुळं ठाकरे गट शिंदे गटावर सडकून टीका करतो असतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना का सोडली, याचं स्पष्टीकरण दिलं.

शिवसेनेमधील बंडाळीमुळं महाराष्ट्राचं राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. शिंदे गटातील ४० आमदारांच्या गटाने भाजपासोबत सत्तास्थापना केली. एकनाथ शिंदेच्या बंडामुळं ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. ठाकरे गटाकडून कायम 40 गद्दार, 50 खोके एकमद, ओके अशी टीका शिंदे गटावर केली जाते. आता गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाष्य करत खा. संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी पूर्वीही सांगितलं होतं की, आम्ही उद्धव ठाकरेंना आधीच सावध केलं होतं की, बघा पुढं रेड झोन आहे. आपली गाडी पुढ जाऊ नका. गाडी फेल होईल. आपण गाडी थांबवली पाहिजे. कारण रस्ता चुकीचा दिसतोय. गाडी यु-टर्न घेतली पाहिजे. पण काही चुकीचं कंटक्टर भेटले संजय राऊतसारखे. त्यांनी चुकीचं मार्गदर्शन केल्यामुळं जी गाडीचा ट्रॅक बदलवून टाकला आणि गाडी भरटकटी.. एकदा गाडी ट्रॅकवरून घरसली ते परत ट्रॅकवर आलीच नाही, अशा शब्दात टीका केली.

नौदलात अधिकारी व्हायचं? मग लवकर करा अर्ज; ‘या’ पदांच्या 227 जागांसाठी भरती जाहीर

पाटील म्हणाले, बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली ती हिंदुत्वाची आहे. मग राष्ट्रवादीच्या मांडिला माडी लावून बसू शकतो का? कॉंग्रेसने कायम आमची कोंडी केली… आमच्या कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ आणलं… भगव्याला विरोध केला… राहुल गांधीं हातात भगवा घेत नाहीत, मग आम्ही त्यांच्यासोबत का जावं… पहिलं आमचं स्वप्न आहे हिंदुत्व
आहे. आणि हिंदुत्वाला वाचवण्यासाठी आम्ही बंड केलं, असं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, काही चुकीचं कंटक्टर भेटले संजय राऊतसारखे. त्यांच्यामुळं आम्ही बंड केलं. ठाकरेंभोवती असलेल्या चार लोकांच्या कोंडाळ्यामुळं हे बंड करणं भाग पडलं, असं पाटलांनी सांगितलं. आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us