नौदलात अधिकारी व्हायचं? मग लवकर करा अर्ज; ‘या’ पदांच्या 227 जागांसाठी भरती जाहीर

नौदलात अधिकारी व्हायचं? मग लवकर करा अर्ज; ‘या’ पदांच्या 227 जागांसाठी भरती जाहीर

Indian Navy Recruitment 2023 : देशभरातील अनेक तरुणांना भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी करण्याची इच्छा असते. लाखो विद्यार्थी यासाठी तयारी करत असतात.  नौदलात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता आनंदाची वार्ता आहे.  भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे.  नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी (Short Service Commission Officer) पदांच्यचा रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र, उमदेवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून उमदेवारांना त्यांचे http://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन भरता येणार आहेत.  भारतीय नौदल भरती मंडळाने एप्रिल 2023 च्या जाहिरातीत एकूण 227 रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार, ही भरती केली जाणार आहे. एसएससी पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर तपशील हा नोटिफिकेशमध्ये देण्यात आला आहे.

भारतीय नौदलाच्या भरतीसाठी अर्ज करताना पात्रता धारक उमेदवारांनी दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला,  ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो ही कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.

या भारतीय नौदलाच्या भरतीसाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये शासन नियमानुसार सुट दिली आहे. याचा तपशील प्रसिध्दी पत्रकात दिला आहे. महत्वाचं असं की, उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी संबंधित नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण, अर्जात काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

पदाचे नाव – शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC अधिकारी)

एकूण रिक्त पदे – 227

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कोठेही

शैक्षणिक पात्रता
1. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकेड मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा महाविद्यालयीन  एम.एस.सी ही पदव्युत्तर पदवी असली पाहिजे. महत्वाचं म्हणजे, उमेदवार हा 60 टक्के गुणांनी ही ड्रिग्री पास असावा.
उमेदवार हा Math किंवा physics मध्ये B.sc धारक असावा.

2. किंवा उमेदवारने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

Maharashtra Rain : राज्यात अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान, बळीराजाचा पाय खोलात
शुल्क – कुठलेही शुल्क नाही.

वयोमर्यादा –
उमेदवार हा 2 जानेवारी 1994 ते 1 जुलै 2004 च्या दरम्यान जन्मलेला असावा.
एससी आणि एसटी उमेदवारांना 5 वर्षाची सुट
ओबीसी उमेदवारांना 3 वर्षाची सुट

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1_YImd9BiYBOCS2ke4ItvoxkI06zUK8Qf/view

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील संकेतस्थळा भेट द्या : http://www.joinindiannavy.gov.in/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube