Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर दिसून येत आहे. त्यात काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी झाली आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफाही थंडविल्या आहेत. त्यानंतर एकमेंकावर जोरदार कुरघोडी सुरू आहेत. त्यात आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे अडचणीत आले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाला ईडीचा दणका ! 41 कोटींची मालमत्ता जप्त
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज सार्वभौमत्व असे विधान केले आहे. हे विधान काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले आहे. यावरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीचे दखल घेत आयोगाने खर्गे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे किंवा त्यामध्ये दुरुस्त करावे, असे सांगितले आहे.
मला ‘ईडी’ची नोटीसच नाही…जिल्हाधिकारी पांडेंचं स्पष्टीकरण
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी 6 मे रोजी एक ट्वीट केले आहे. त्यात कर्नाटकातील साडेसहा कोटी लोकांना मोठा संदेश पाठवला आहे. काँग्रेस कोणालाही कर्नाटकच्या प्रतिष्ठेला, सार्वभौमत्वाला किंवा अखंडतेला धोका निर्माण करू देणार नाही,’ असं त्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी भाजप नेते भूपेंद्र यादव, डॉ. जितेंद्र सिंह, तरुण चुग, अनिल बलुनी आणि ओम पाठक यांनी ट्वीट करून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.