सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांना ईडीचा दणका; तब्बल 41 कोटींची मालमत्ता जप्त

सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांना ईडीचा दणका; तब्बल 41 कोटींची मालमत्ता जप्त

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला (Zavareh Soli Poonawala) यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्या मुंबईतील सीडे हाऊसमधील 41. 64 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तीन स्थावर मालमत्तावर ही कारवाई झाली आहे.

फेमा कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पनामा पेपर प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. त्यानंतर ते ईडीचे रडावर आले आहेत. ईडीने झे. एस. पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांबाबत तपास केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ईडीकडून केला जात आहे.

कर्नाटकात निवडणूक प्रचार संपला, सोनिया गांधींच्या वक्तव्यावरून भाजपला मिळाले नवे ‘शस्त्र’

पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाने एलआरएस योजनेच्या तरतुदींचा गैरवापर करून परदेशात परकीय चलन पाठवले होते. त्यांनी कमाल मर्यादेचा वापर केला. या कुटुंबाने 2011 ते 2012 या दोन वर्षांत कुटुंब देखभाल आणि स्वत: ची देखभाल या बहाण्याने चुकीच्या घोषणांद्वारे परदेशात पैसे पाठवले. पण त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य परदेशात राहत नाही किंवा एनआरआयचा दर्जा धारण करत नाही, असे ईडीच्या चौकशीत समोर आले आहे.

मला ‘ईडी’ची नोटीसच नाही…जिल्हाधिकारी पांडेंचं स्पष्टीकरण

झेड. एस. पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाने LRS अंतर्गत पाठवलेला पैसा कथितपणे ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमधील स्टॉलस्ट लिमिटेडमध्ये गुंतवला गेला होता. यूकेमध्ये चार मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा पैसा वापरला गेला. यामध्ये लंडन येथील चार अपार्टमेंट्सचा समावेश आहे.

या व्यवहारांमध्ये फेमा कायद्याचे उल्लंघन दिसून आले. परकीय संपत्ती आरबीआयला घोषित केलेली नाही. त्यांनी आजपर्यंत परदेशी मालमत्ता जपून ठेवल्या आहेत आणि त्यांचा सतत उपभोग घेत आहेत, असे ईडीने स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube